'पतंजली'ही विकते चिकन मसाला! असे आहे व्हायरल सत्य

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने देशभरातील बाजारपेठ बऱ्यापैकी काबीज केली आहे. स्वदेशी बनावटीचे आणि शुद्ध शाकाहारी उत्पादने हे पतंजलीचे खास वैशिष्ट्य. पण, पतंजली चिकन मसाला विकत असल्याचे काही मेसेज आणि फोटो सध्या सोशल मीडियावर भलतेच व्हायरल होत आहेत. काय आहे त्यामागचे व्हायरल सत्य?

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 24, 2017, 02:52 PM IST
'पतंजली'ही विकते चिकन मसाला! असे आहे व्हायरल सत्य title=

नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने देशभरातील बाजारपेठ बऱ्यापैकी काबीज केली आहे. स्वदेशी बनावटीचे आणि शुद्ध शाकाहारी उत्पादने हे पतंजलीचे खास वैशिष्ट्य. पण, पतंजली चिकन मसाला विकत असल्याचे काही मेसेज आणि फोटो सध्या सोशल मीडियावर भलतेच व्हायरल होत आहेत. काय आहे त्यामागचे व्हायरल सत्य?

पतंजली चिकनचा हा फोटो पुढे येताच सोशल मीडियावर हा फोटो ट्रोलही होऊ लागला आहे. शुद्ध शाकाहारी पदार्थ विकणाऱ्या बाबांची कंपनी चिकन मसालाही विकत असल्याचा मेसेज ट्रोल झाल्याने लोकांनीही मग विविध प्रतिक्रीया द्यायला सुरूवात केली आहे. पण, हा फोटो किती सत्य आहे. याबाबत तुम्हाला माहिती आहे काय?

मीडिया रिपोर्टनुसार, फोटो व्हायरल झालेले हे उत्पादन बाबा रामदेव यांच्या पतंजलीचे नाहीच आहे. हा चिकन मसाला पतंजली फूड्स नावाच्या एका वेबसाईटवरून विकला जात आहे. बूमलाईव्हच्या हवाल्याने जनसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तात हा चिकन मसाला विकणारी patanjalifoods.com नावाची ही बेबसाटी साईट कॅनडाची असून, या साईटवर १.९९ डॉलर म्हणजेत भारतीय चलनात १२९ रूपयांना हा मसाला विकला जात आहे.

 

 

विशेष असे की, या मसाला पॅकेटवर हिरव्या रंगाचा ठिपकाही दिसत आहे. कंपनीचा लोगोही पतंजलीच्या लोगोशी साधर्म्य दाखवणारा आहे. अमेरिका आणि कॅनडात उत्पादनाचे वितरण करणाऱ्या या कंपनीचे रजिष्ट्रेशन १८ जुलै २०१५ मध्ये झाले आहे. जगजीत थमी असे या कंपनीच्या मालकाचे नाव असून, हे गृहस्थ कोलंबियात राहात असल्याची माहिती आहे. यात गोंधळात टाकणारा आणखी एक मुद्दा असा की, रामदेव बाबा यांची पतंजली कॅनडातही आपली उत्पादने विकते. नामसाधर्म्यामुळे झालेल्या घोळावर प्रतिक्रीया देताना रामदेव बाबा यांची पतंजली कोणत्याही प्रकारचे असले पदार्थ विकत नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच, संबंधीत कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही रामदेव बाबा यांच्या पतंजलीने केली आहे.