Fact Check | बोटीतून उडी मारुन खरंच वाघ इतक्या खोल पाण्यात पोहून गेला का?

सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हीडिओ हे व्हायरल होत असतात.

Updated: Apr 18, 2022, 11:02 PM IST
Fact Check | बोटीतून उडी मारुन खरंच वाघ इतक्या खोल पाण्यात पोहून गेला का?  title=

मुंबई : सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हीडिओ हे व्हायरल होत असतात. मात्र त्यापैकी काही आणि मोजकेच व्हीडिओ हे नेटकऱ्यांच्या पसंतीस पडतात. असाच एक व्हीडिओ वाघाचा व्हीडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या व्हीडिओमध्ये हा वाघ बोटीतून पाण्यात उडी मारताना दिसतोय. (fact check tiger dive in water and swiming video gose on social media)

पाण्यात उडी मारल्यानंतर मनसोक्तपणे तो पोहण्याचा आनंद घेतोय. वाघ गार गार पाण्यात पोहतोय.  तसेच पोहच पोहत तो किनारी पोहचतो. किनारी पोहचल्यानंतर तो धावताना दिसतो. हा व्हीडिओ जुना असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच हा व्हीडिओ पश्चिम बंगालमधील असल्याचा दावा केला जातोय.