Artificial Eye : नजर कमी झाल्यास नवे डोळे लावता येणार?

कृत्रिम डोळा  (Artificial Eye) मानवी त्वचेपासून तयार करण्यात आलाय. अशर सिंड्रोमने रुग्णाच्या त्वचेच्या पेशी गोळा केल्या.  

Updated: Dec 3, 2022, 10:53 PM IST
Artificial Eye : नजर कमी झाल्यास नवे डोळे लावता येणार? title=
प्रातिनिधिक छायाचित्र

Viral Polkhol : आता डोळ्यांची (Eyes) नजर कमी झाली तरी घाबरायची गरज नाही. कारण, आता कृत्रिम डोळ्यांनी (Artificial Eye) जग पाहता येणार आहे. हा दावा करणारा मेसेज व्हायरल झालाय. हा दावा खरं असेल तर त्याची माहिती देणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल (Fact Check) केली. मग काय सत्य समोर आलं. 
(fact check viral polkhol now new eyes can be implanted in case of vision loss know what true what false)

दावा आहे की, तुमची नजर कमी झाली किंवा ज्यांना दिसतच नाही त्यांनी काळजी करायची गरज नाही. कारण, आता कृत्रिम डोळ्यांनी जग पाहता येणार आहे. हा दावा केल्यामुळे अनेकांना आनंदाचीच बातमी मिळालीय. असं असेल तर ज्यांची नजर गेलीय अशा लाखो लोकांना ही नवसंजीवनीच असेल. त्यामुळे या दाव्याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्यावेळी कृत्रिम डोळा तयार केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आमच्या पडताळणी काय समोर आलं ते पाहुयात.

व्हायरल पोलखोल

3D मिनी आईज हा कृत्रिम डोळा बनवण्यात आलाय. मानवाच्या नैसर्गिक डोळ्याप्रमाणे तो काम करेल. डोळे गमावलेल्यांना जग पाहणं सोप्पं होईल. लंडन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हा डोळा तयार केलाय. 

कृत्रिम डोळा मानवी त्वचेपासून तयार करण्यात आलाय. अशर सिंड्रोमने रुग्णाच्या त्वचेच्या पेशी गोळा केल्या. यापासून स्टेम सेल्स तयार करण्यात आले. त्यानंतर कृत्रिम डोळ्यात सात प्रकारच्या पेशी तयार करण्यात आल्या. या डोळ्यामुळे अनेकांची दृष्टी आणण्यास मदत होईल. पण, यावर संशोधन सुरू असून, लवकरच प्रत्यक्षात येईल. त्यानंतर याची किंमत किती? नजर गेलेल्या सगळ्यांनाच हे उपयुक्त ठरतंय का? हे स्पष्ट होईल. पण, कृत्रिम डोळा तयार केल्याचा दावा सत्य ठरला.