UPSC Exam: यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेत रुजू होत देशसेवा करण्याचं अनेक युवकांचं स्वप्न असतं. यूपीएसी परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. स्वप्न साकार करण्यासाठी तरुण कठोर परिश्रम घेतात. दिवसरात्र एक करून मेहनत घेतात. ही परीक्षा उत्तीर्ण होणारे उमेदवार IAS होतात. पण आयएएस अधिकारी होणं वाटतं तितकं सोपं नाही. पण आज आम्ही अशाच काही आयएएस अधिकाऱ्यांची यशोगाथा सांगणार आहोत. हे आयएएस अधिकारी शाळेत नापास झाले होते. पण मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यूपीएससी पास झाले आणि आएएस अधिकारी झाले.
रुक्मणी रियार: आयएएस रुक्मणी रियार राजस्थानमध्ये कलेक्टर आहेत. त्या मुळच्या पंजाबमधील चंदीगडची आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या सहावीच्या वर्गात नापास झाली होत्या. पण असं असतानाही यूपीएससी परीक्षेत एआयआर 2 मिळवून इतके मोठे स्थान मिळवले आहे. रुक्मणी रियार यांचे वडील देखील आयएएस अधिकारी आहेत.
मनोज शर्मा: महाराष्ट्र केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी मनोज शर्मा हे 12वी मध्ये नापास झाले होते. इयत्ता 12वीत अनुत्तीर्ण होण्याव्यतिरिक्त, एव्हरेज विद्यार्थी होते आणि खूप कमी गुणांसह पास व्हायचे. त्यांची यशोगाथा वाचून सर्वांना खरोखरच प्रेरणा मिळते.
Knowledge News: रस्त्यावरील वेगवेगळ्या रंगाच्या Milestrones चा नेमका अर्थ काय? जाणून घ्या
अंजू शर्मा: आयएएस अंजू शर्माने स्वतः एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, ती दहावीच्या प्री बोर्ड परीक्षेत नापास झाली होती. इतकंच नाही तर 12वीला पुन्हा एकदा सामोरे जावे लागले. मात्र, नंतर परीक्षा उत्तीर्ण झाल्या. आयएएस अंजू शर्माने या घटनेतून शिकत कठोर परिश्रम केले आणि पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. या काळात त्याच्या आईने त्याला साथ दिली.