महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेशातही शेतकरी रस्त्यावर

महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेशातही कर्जमाफी आणि हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मध्य प्रदेशातल्या मंदसौरमध्ये शेतक-यांच्या आदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. पोलिसांच्या गोळीबारात तीन शेतकरी ठार झाले आहेत. तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमी शेतक-यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहेत.

Updated: Jun 6, 2017, 04:57 PM IST
महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेशातही शेतकरी रस्त्यावर title=

भोपाळ : महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेशातही कर्जमाफी आणि हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मध्य प्रदेशातल्या मंदसौरमध्ये शेतक-यांच्या आदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. पोलिसांच्या गोळीबारात तीन शेतकरी ठार झाले आहेत. तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमी शेतक-यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहेत.

मात्र हा गोळीबार केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी केल्याचा दावा राज्याच्या गृहमंत्र्यांनी केलाय. त्यामुळं गोळीबार कुणी केला यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शेतमालाला हमी भाव आणि कर्जमाफीसाठी गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशात भारतीय किसान संघासह शेतक-यांच्या विविध संघटनांनी आंदोलन सुरू केलंआहे. मात्र किसान संघानं आता या आंदोलनातून माघार घेतली आहे.