महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाची धग पोहोचली पंजाबमध्ये

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशनंतर शेतकऱ्यांचं आंदोलन आता पंजाबमध्ये पोहोचलं आहे. कर्जमाफीसाठी शेतकरी एकत्र येत आहेत. भारतीय शेतकरी युनियनचे नेते चंदीगडमध्ये बैठका घेत आहेत.

Updated: Jun 9, 2017, 01:29 PM IST
महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाची धग पोहोचली पंजाबमध्ये title=

चंदीगड : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशनंतर शेतकऱ्यांचं आंदोलन आता पंजाबमध्ये पोहोचलं आहे. कर्जमाफीसाठी शेतकरी एकत्र येत आहेत. भारतीय शेतकरी युनियनचे नेते चंदीगडमध्ये बैठका घेत आहेत.

पंजाबमधील मालवा भागात आज शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. बैठकीमध्ये हे देखील ठरवण्यात आलं की, १० जूनला देशातील इतर शेतकरी संघटनांशी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. त्यानंतर १२ जूनला पंजाबमध्ये देखील कर्जमाफीसाठी आंदोलन सुरु करण्यात येणार आहे. पंजाबमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार आहे.

पंजाबमध्ये दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं देखील समोर येत आहे. फतेहगडमध्ये कर्जबाजारीपणामुळे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सुरु झालेलं शेतकऱ्यांचं आंदोलन आता देशभरात पोहोचत आहे.