राम हे केवळ हिंदूंचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे देव - फारूक अब्दुल्ला

फारूक अब्दुला यांनी राम मंदीर प्रकरणी भाजपावर निशाणा साधला.

Updated: Feb 14, 2019, 07:41 AM IST
राम हे केवळ हिंदूंचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे देव - फारूक अब्दुल्ला title=

नवी दिल्ली : नॅशनल कॉन्फरन्सचे नेता फारूक अब्दुला यांनी राम मंदीर प्रकरणी भाजपावर निशाणा साधला. प्रभु राम हे केवळ हिंदूंचेच असल्याच्या भावनेवर जोर दिला जातोय हे स्पष्ट करताना प्रभु राम केवळ हिंदूचेच देव आहेत का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. देशात सर्व धर्माच्या व्यक्तींना सन्मानाने समान जगण्याचा अधिकार आहे, असेही ते म्हणाले. आम आदमी पार्टीने बुधवारी भाजपा विरोधात महारॅलीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. या दोघांना मात द्यायलाच हवी कारण हे दोघेही लोकशाही आणि संविधानिक मुल्यांसाठी धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले. 

जोपर्यंत आपली मनं स्वच्छ नसतील तोपर्यंत आपण त्यांना (मोदी आणि शाह) सहजासहजी हटवू शकत नाही. जर देशाला वाचवायचे असेल तर आपल्याला कुर्बानी द्यायला हवी. असे देशासाठी करा, खुर्चीसाठी नको असेही जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री अब्दुला यांनी सांगितले. 

Image result for farooq abdullah zee news

आज आपल्याकडे धार्मिक आधारावर हिंदु आणि मुस्लिमांना वाटले जात आहे. मला हिंदुना विचारायचे आहे, ''राम केवळ हिंदुंचाच आहे का ? पवित्र ग्रंथांमध्ये लिहिले आहे की राम हे संपूर्ण जगाचे देव आहे. ते सर्वांचे आहेत. आम्हाला आपली लढाई विसरण्याची गरज आहे.'' मुस्लिम समाजाने कुठे जाऊ नये, काय करु नये हे सांगितले जाते, हे दुर्देव असल्याचे ते म्हणाले. हा देश काय त्यांच्या पुर्वजांचा आहे का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

या देशात सर्व धर्माच्या लोकांना जगण्याचा समान अधिकार आहे. हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई आपण सर्व भाऊ आहोत आणि भापत प्रत्येक भारतीयासाठी असल्याचेही ते म्हणाले.