भयंकर! 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वडिलांकडून बलात्कार

मुलगी-वडील यांच्या नात्याला काळीमा फासणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 

Updated: Jan 23, 2021, 06:14 PM IST
भयंकर! 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वडिलांकडून बलात्कार

बुंदी: मुलगी ही वडिलांच्या सर्वात जवळची आणि लाडकी समजली जाते. मात्र याच काळजाच्या तुकड्यावर जनावरासारखे बापानं अत्याचार केल्यानं संताप व्यक्त होत आहे. मुलगी-वडील यांच्या नात्याला काळीमा फासणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 10 वर्षांच्या पोटच्या मुलीवरच वडिलांनी बलात्कार केल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लांबाखोह येथे राहणाऱ्या वडिलांनी आपल्या 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. या धक्कादायक घटनेची कबुली शुक्रवारी रात्री देण्यात आली. पीडित अल्पवयीन मुलीनं शेजाऱ्यांच्या मदतीनं डाबी पोलीस ठाण्यात आपल्या वडिलांविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. 

संतापजनक, शस्त्रक्रियेनंतर कडाक्याच्या थंडीत स्तनदा मातांना फरशीवर झोपवले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अल्पवयीन पीडितेचे वडील आपल्या तीन मुलींसोबत मोलमजुरीचं काम करतात. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतलं आहे. तर वडिलांची कसून चौकशी सुरू आहे. ही धक्कादायक घटना राजस्थानमधील बुंदी या परिसरात घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.