पोलीस स्टेशनमध्ये मुलाचा तोडलेला हात घेऊन पोहोचला बाप, काय आहे प्रकरण!

अगदी शुल्लक कारणावरून वडिलांनी आपल्या पोटच्या पोराचा हात तोडला आहे. 

Updated: Aug 5, 2022, 06:51 PM IST
पोलीस स्टेशनमध्ये मुलाचा तोडलेला हात घेऊन पोहोचला बाप, काय आहे प्रकरण! title=

Crime News : जन्मदात्या बापाने आपल्याच मुलाचा हात तोडत थेट पोलीस स्टेशनचा रस्ता पकडला. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली. अगदी शुल्लक कारणावरून वडिलांनी इतकं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समजत आहे. वडिल मुलाचा हात घेऊन जात असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मोतीलाल पटेल असं आरोपी वडिलांचं नाव आहे.

नेमकं काय घडलं? 
मोतीलाल पटेल यांनी दुपारच्यावेळी मुलाकडे म्हणजे संतोषकडे दुचाकीची चावी मागितली होती. मुलाने चावी देण्यास नकार दिला. मुलाने चावी न दिल्यामुळे मोतीलाल चांगलेच संतापले. संतापाच्या भरात त्यांनी घरातील कुऱ्हाड घेतली आणि संतोषच्या हातावर मारली.

मोतीलाल यांनी रागाच्या भरात कुऱ्हाडीचा घाव इतक्या जोरात मारला होता, संतोषचा डावा हात धडापासून वेगळा झाला. हात तुटल्यावर मोतीलाल पटेल हात घेऊन थेट पोलीस स्टेशनला गेले. संतोषचा हात तुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि तो बेशुद्ध झाला. संतोषला रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

दरम्यान, ही घटना मध्य प्रदेशमधील दमोह जिल्ह्यातील बोबई या गावची आहे. हे प्रकरण पथरिया पोलीस स्टेशन हद्दीतील जेरठ चौकीच्या परिसरातील आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.