Nirmala Sitharaman: अर्थमंत्र्यांच्या लाल साडीमुळे इंदिरा गांधी चर्चेत, 'या' राज्याशी खास नातं!

Nirmala sitharaman, Budget 2023:गेल्या 5 वर्षात त्यांच्या साड्यांची चर्चा होताना दिसते. यंदाच्या अर्थसंकल्पवेळी सीतारमण यांनी संबलपुरी सिल्क साडी (Sambalpuri Silk Saree) परिधान केली होती.

Updated: Feb 1, 2023, 11:46 AM IST
Nirmala Sitharaman: अर्थमंत्र्यांच्या लाल साडीमुळे इंदिरा गांधी चर्चेत, 'या' राज्याशी खास नातं! title=
nirmala sitharaman,budget 2023

Union Budget 2023:  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) सध्या लोकसभेत बजेट सादर (Budget 2023) करत आहेत. सर्व देशात भारताचा विकास दर अधिक आणि  देश वेगाने प्रगती करत आहे, असं म्हणत सीतारमण यांनी भाषणाला सुरूवात केली. बजेटमध्ये अधिकाधिक घोषणा होत असल्याचं पहायला मिळत असतानाच आता अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या साडीची (Nirmala sitharaman dons bright red saree) चर्चा होताना दिसत आहे. (Finance Minister nirmala sitharaman dons bright red saree for union budget 2023 marathi news)

यंदा निर्मला सीतारमण यांनी तपकिरी बॉर्डरची लाल रंगाची (Red Saree) साडी परिधान केली होती. दरवर्षी सीतारमण अर्थसंक्लप (Union Budget 2023) सादर करताना लाल शेडच्या साड्या परिधान करताना दिसतात. गेल्या 5 वर्षात त्यांच्या साड्यांची चर्चा होताना दिसते. यंदाच्या अर्थसंकल्पवेळी सीतारमण यांनी संबलपुरी सिल्क साडी (Sambalpuri Silk Saree) परिधान केली होती.

संबलपुरी सिल्क साडीची वैशिष्ट्ये -

ओडिशा (Odisha) राज्यातील बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्याला असणाऱ्या किंवा विणल्या जाणाऱ्या साड्यांना संबळपुरी म्हटलं जातं.  हातमागावर ही साडी तयार केली जाते. संबळपुरी हे गाव (Sambalpuri village) खासकरून संबलपुरी सिल्क साड्यांसाठी ओळखलं जातं. संबळपुरी साडीचे चार ते सहा वेगवेगळे प्रकार आहेत. 

इंदिरा गांधींशी खास कनेक्शन -

1980 च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी ही साडी परिधान केल्यानंतर या साडीचं महत्त्व वाढलं. इंदिरा गांधींमुळे (Indira Gandhi Sambalpuri Silk Saree) संपूर्ण भारतात या साडीची चर्चा झाली आणि संबळपुरी प्रसिद्ध झालं. त्यानंतर आता मोठा व्यवसाय या गावातून चालतो. 

आणखी वाचा - Budget 2023: 5 बजेट 5 लुक्स; अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांच्या प्रत्येक लुकमध्ये असतो एक खास संदेश

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन अनेकदा नोटांशी जुळणारी साडी नेसतात. त्यांनी क्रीम कलरची मंगलागिरी साडीही (Mangalagiri Sarees) नेसलेली दिसली होती. 20 रुपयांच्या नोटेशी जुळणार्‍या हिरव्या मंगलगिरी साड्यांचा देखील त्यांनी2019 मध्ये नेसली होती. त्यानंतर आता संबळपुरीच्या साडीची चर्चा होताना दिसत आहे.