हैदराबाद : राष्ट्रगीत सुरू असताना उभे न राहिल्याने जम्मू-काश्मीरच्या ३ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील इंजीनिअरिंगचे ३ विद्यार्थी हैदराबादेत, सिनेमा हॉलमध्ये राष्ट्रगान सुरू असताना, खालीच बसून होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ही घटना काल दुपारची आहे, जेव्हा एका खासगी महाविद्यालयाचे विद्यार्थी, सिनेमा पाहण्यासाठी राजेंद्रनगरजवळील सिनेमा हॉलमध्ये गेले, तेथे राष्ट्रगीत सुरू झालं आणि हे तीनही विद्यार्थी आपल्याच जागी बसून होते.
या तीनही विद्यार्थ्यांचं वय २० ते २५ दरम्यान आहे. १९७१ चा राष्ट्रीय सन्मानाचा अनादर करण्यापासून रोखण्याच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास सुरू असल्याचं डीसीपींनी सांगितलं.