छत्तीसगड : छत्तीसगडची राजधानी रायपुरमधील आंबेडकर हॉस्पीटलमध्ये ऑक्सिजन सप्लाय थांबल्याने तीन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
ऑपरेटर रवि चंद्रा ड्यूटीवेळी दारूच्या नशेत झोपला होता. त्यामुळे ऑक्सीजन सप्लाय बंद झाला असा आरोप केला जात आहे. दरम्यान वेंटिलेटरवर ठेवलेल्या तीन मुलांचा गुदमरून मृत्यू झाला. न्यूज 18 ने यासंबधीचे वृत्त दिले आहे.
हॉस्पीटलमध्ये अर्ध्या तासासाठी ऑक्सिजन सप्लाय बंद होता. नर्सिंग वार्डमध्येही अशीच भयानक स्थिती होती. रात्री उशीरा तीन सीएमओ हॉस्पीटलमध्ये पोहोचले तेव्हा ऑक्सिजन सप्लाय बंद होता.
अजून काहीवेळ ऑक्सिजन सप्लाय बंद राहिला असता तर खुप मोठी घटना घडली असती असेही सांगितले जाते.
ऑक्सिजनचा प्रेशर कमी झाल्यानेच ही घटना घडल्याचे छत्तीसगढचे कलेक्टर आर. प्रसन्ना यांनी सांगितले. या घटनेवर मुख्यमंत्री डॉ. रमन सिंह यांनी दु: ख व्यक्त केले आहे.
घटनेला जबाबदार असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.