आग आणि सर्वत्र धुरच धूर, ट्रेनचे डब्बे जळाले; पहा घटनेचा व्हिडिओ

बिहारमधील मधुबनी रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका रिकाम्या ट्रेनला भीषण आग लागली.

Updated: Feb 19, 2022, 10:55 AM IST
आग आणि सर्वत्र धुरच धूर, ट्रेनचे डब्बे जळाले; पहा घटनेचा व्हिडिओ title=

बिहार : बिहारमधील मधुबनी रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका रिकाम्या ट्रेनला भीषण आग लागली. या भीषण आगीत ट्रेनच्या 5 बोगींना जळून खाक झाल्या. 

रेल्वेला लागलेल्या आगीच्या ज्वाळा दूरवर दिसत आहेत. आगीमुळे आकाशात सर्वत्र धुराचे लोट दिसत असून या घटनेमुळे स्थानकात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने या आगीत कोणतीही दुर्घटना घडलेली नाही.

या आगीचा व्हिडिओ समोर आला असून यात ही आग किती भीषण होती हे दिसून येते. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.