ओरीसा : कुणाचं नशीब कधी आणि कसे बदलेल हे सांगता येत नाही. असे या घटनेतील मश्चिमाराला पाहून वाटत आहे. कारण एकाच रात्री या मच्छिमाराचे (fisherman) नशीब पालटले आहे. मासेमारी करायला गेलल्या या मश्चिमाराच्या गळाला दुर्मिळ मासा (Rare Fish) लागला होता. या दुर्मिळ माशाची बाजारात खुप किंमत आहे. त्यामुळे मच्छिमाराने हा दुर्मिळ मासा बाजारात विकल्याने तो मालामाल झाला आहे. या दुर्मिळ माशामुळे मच्छिमाराच नशीब उजळलं आहे.
ओरीसाच्या बालसोरचा एक मच्छिमार (fisherman) समुद्रात मासेमारीसाठी गेला होता. यावेळी मासेमारी करताना त्यांच्या गळाला दुर्मिळ मासा लागता. या माशाला घरी घेऊन आणल्यावर त्याला कळालं की हा एक दुर्मिळ मासा आहे आणि त्याची बाजारात खुप मोठी किंमत आहे.
हा मासा इतर माशांपेक्षा (Rare Fish) दिसायला अगदी वेगळा आहे, तो सामान्य मासा देखील नाही असे म्हणता येईल. मार्लिन उर्फ सेलर मार्लिन असे या माशाचे नाव सांगितले जात आहे. ज्याचे वजन 550 किलो आहे. सध्या या माशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या दुर्मिळ माशाबाबत सहाय्यक मत्स्यव्यवसाय अधिकारी पार्थसारथी स्वैन यांनी सांगितले की, या माशाच्या अवशेषांचा वापर औषध म्हणून केला जातो. माशाच्या अवशेषापासून नैराश्यविरोधी औषधे बनवले जाते, असे त्यांनी सांगितले आहे.
Odisha| A rare carnivorous species fish called Marlin AKA Sailor Marlin weighing 550kg was netted in Balasore. The fish was sold for Rs 1 Lakh.
It is said that remains of this fish are used to make anti-depressant medicines: Parthasarathi Swain, Assistant Fisheries Officer pic.twitter.com/QUFFWk426s— ANI (@ANI) November 15, 2022
या दुर्मिळ माशाची (Rare Fish) बाजारात खुप मागणी असते. तसेच असे मासे क्वचितच मश्चिमारांच्या हाती लागतात. त्यामुळे मच्छिमार या माशाला बाजारात घेऊन जाताच त्याला लाखोंची बोली लागली. अखेर या माशाला मच्छिमाराने 1 लाख रूपयांनी विकले आहे.
दरम्यान या दुर्मिळ माशामुळे (Rare Fish) मश्चिमार मालामाल झाला आहे. एकाच रात्री त्याचे नशीब पालटलं आहे. या माशाची आता सर्वत्र चर्चा रंगली आहे.