लंडनहून भारतात आलेल्या पाच जणांना कोरोनाची लागण

युपोपिय देशात कोरोनाचा नवा विषाणू (New Coronavirus) सापडला आहे. सापडलेला नवा कोरोनाचा विषाणू अधिक घातक आहे. (Corona's new virus is ruinous) त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे.  

Updated: Dec 22, 2020, 12:38 PM IST
लंडनहून भारतात आलेल्या पाच जणांना कोरोनाची लागण
संग्रहित छाया

इंग्लंड : युपोपिय देशात कोरोनाचा नवा विषाणू (New Coronavirus) सापडला आहे. सापडलेला नवा कोरोनाचा विषाणू अधिक घातक आहे. (Corona's new virus is ruinous) त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोनाचा नवा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा घातक आहे. त्यामुळे भारतातही योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. काही विमानाना देशात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, लंडनहून (London) दिल्लीत (Delhi) आलेल्या २६६ प्रवाशांपैकी ५ जणांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाल्याचे पुढे आले आहे. सर्व प्रवासी काल रात्री दिल्लीत दाखल झाले होते. पाचही रुग्णांचे सँपल्स पुढील तपासासाठी पाठविण्यात आले आहेत.

कोरोनाचा नवा विषाणू सापडल्याने युरोपिय देशांत पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच गर्दीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. भारतात लंडनहून दिल्लीत आलेल्या २६६ प्रवाशांपैकी ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे.(Five passengers, crew from UK test Covid-19 positive) हे सर्व प्रवासी काल रात्री दिल्लीत दाखल झाले. त्यांची चाचणी केली असता त्यातचे पाच जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या पाचही कोरोना बाधित रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

कोरोनाच्या नवा विषाणूचा प्रादुर्भाव ७० टक्के अधिक असल्याने याचा फैलाव कोरोनाहून कित्येक पटीने अधिक होऊ शकतो. सप्टेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये या नव्या विषाणूने पाय पसरायला सुरुवात केली. आता या विषाणूने मोठे रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणणानुसार कोरोना विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक प्रमाणात याचा संसर्ग सुरु आहे. सध्याच्या कोरोना विषाणूपेक्षा नव्या कोरोना विषाणूचा ४० ते ७० टक्क्यांनी जलद प्रसार होऊ शकतो. त्यामुळे तयार करण्यात आलेल्या कोरोना 'लस'चा प्रभाव कमी होण्याचा धोका आहे.