विमान भितींवर आदळलं, मुंबईत विमानाचं इमर्जन्सी लँडींग

मोठा अपघात टळला

Updated: Oct 12, 2018, 10:07 AM IST
विमान भितींवर आदळलं, मुंबईत विमानाचं इमर्जन्सी लँडींग title=

मुंबई : तामिळनाडूतील त्रिची विमानतळावर एक मोठा अपघात टळला आहे. एअर इंडियाचं त्रिची-दुबई हे विमान उड्डाणाच्या वेळी विमानतळाच्या संरक्षक भिंतीवर आदळलं. या अपघातानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाला. विमानातून १३० प्रवासी प्रवास करत होते. 

रात्री दीडच्या सुमारास हे विमान मुंबईत उतरवण्यात आलं. विमानातला बिघाड दुरुस्त करून विमान दुबईला रवाना झालं. सर्व प्रवासी दुबईत सुखरुप पोहोचले आहेत.

मुंबई एअरपोर्टवर विमानाची इमरजेंसी लँडिंग करण्यात आली. विमान भितींवर आदळल्याने विमानांचं नुकसान झालं होतं. पण दुरुस्तीनंतर विमानाला उड्डानासाठी परवानगी देण्यात आली. विमान टेक ऑफ करताना त्रिची एअरपोर्टच्या कंपाउंडच्या भींतीला ठोकलं गेलं होतं. ज्यामुळे त्रिची एअरपोर्टची ही संरक्षण भिंत देखील तुटली आहे.

तमिळनाडुचे पर्यटन मंत्री वेलामांडी एन एनटराजन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी म्हटलं की, 'दुबईला जाणारं विमान टेक ऑफ करताना संरक्षण भिंतीवर आदळलं. विमानातील प्रवासी सुरक्षित असून विमान मुंबईला उतरवण्यात आलं. एअरपोर्टवर अधिकाऱ्यांनी विमानाचं परीक्षण केलं.'