Flipkart धमाकेदार सेल; Dell च्या या प्रोडक्टवर मिळणार 95 % ची सूट

 Flipkart वर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्ससह अनेक प्रोडक्टवर कमालीच्या डील्स आणि बँक ऑफर मिळणार आहेत. 

Updated: Sep 26, 2021, 08:33 AM IST
Flipkart धमाकेदार सेल; Dell च्या या प्रोडक्टवर मिळणार 95 % ची सूट title=

नवी दिल्ली : Flipkart वर लवकरच बिग बिलियन डेज सेल सुरू होणार आहे. परंतु या सेलच्या सुरू होण्याआधीसुद्धा तुम्ही फ्लिपकार्टवर धमाकेदार ऑफर आणि डिस्काउंट्सचा फायदा घेऊ शकता. या आठवड्यात फ्लिपकार्टचा ‘Big Steals of the Week’ ची ऑफर सुरू होणार आहे. यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्ससह अनेक प्रोडक्टवर कमालीच्या डील्स आणि बँक ऑफर मिळणार आहेत. 

डेलचा गेमिंग मॉनिटर
डेलचा हा 24 इंचाचा फुल एचडी एलईडी बॅकलिट वॉल माउटेबल गेमिंग मॉनिटरवर तुम्हाला 95 टक्के सूट मिळणार आहे. 4 लाख 50 हजार रुपयांचा डिवाइस तुम्हाला 19 हजार 683 रुपयांना मिळणार आहे. फ्लिपकार्ट एक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड वापरून तुम्हाला आणखी 985 रुपयांची सूट मिळू शकते. त्यामुळ गेमिंग मॉनिटरची किंमत 18 हजार 698 रुपये होणार आहे. या प्रोडक्टरवर तुम्हाला 3 वर्षांची वॉरंटी मिळणार आहे. सोबतच अनेक बँक ऑफर मिळणार आहेत.

एलजीचा डबल डोअर फ्रिज
LG चा 260 L च्या फ्रॉस्ट प्री डबल डोअर टॉप माऊंट कन्वर्टिंबल फ्रिज जे 33 हजार 190 रुपयांच्या ऐवजी तुम्हाला 26 हजार 290 रुपयांना मिळणार आहे. फिपकार्टवर एक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड वापरल्यास आणखी 1314  रुपयांची सूट मिळणार आहे. सर्व प्रीप्रेड व्यवहारांवर तुम्हाला 5 टक्क्यांचे तत्काल डिस्काउंट मिळेल. जर तुम्ही जुने फ्रिज बदलून नवीन फ्रिज घेणार असाल तर, 12 हजारापर्यंत आणखी सूट मिळवू शकता.

अशाचप्रकारचे धमाकेदार ऑफर फिलिप्सचे इंडक्शन, एलजीचे स्प्लिट डुअल इंवर्टर एसी आदी प्रोडक्टवर देखील उपलब्ध आहेत.