close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष मांगे राम गर्ग यांचे निधन

दिल्ली भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार मांगे राम गर्ग यांचे निधन झाले आहे.

Updated: Jul 21, 2019, 09:59 AM IST
भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष मांगे राम गर्ग यांचे निधन

नवी दिल्ली : दिल्लीच्या राजकारणाला २४ तासांच्या आतच दुसरा झटका लागला आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे शनिवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज दुपारी  दिल्लीतील निगमबोध घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. या वृत्ताला २४ तासही उलटत नसताना आणखी एक दु:ख द बातमी समोर येत आहे. दिल्ली भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार मांगे राम गर्ग यांचे निधन झाले आहे. मांगे राम यांनी दिल्लीतील एक्शन बालाजी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. ते अनेक दिवसांपासून आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे.