Car Number Plate Challan: फॉर्च्युनर कंपनीच्या (Fortuner) लक्झरी एसयुव्ही (SUV) गाडीवर नंबर प्लेटच्या (Car Number Plate) जागी ठाकुर (Thakur) लिहिणं एका वाहनचालकाला फारच महागात पडलं आहे. वाराणीसीमध्ये (Varanasi) एका नंबर प्लेटवर मोठ्या अक्षरांमध्ये ठाकुर असं लिहिण्यात आलं होतं. या गाडीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी (Varanasi Police) तातडीने या गोष्टीची दखल घेत कारवाई केली. पोलिसांनी या प्रकरणामध्ये 28 हजार 500 रुपयांचा दंड गाडी मालकाला ठोठावला आहे.
वाराणसीच्या कैंट परिसरातील एका गाळ्या रंगाच्या एसयुव्ही गाडीचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये गाडीच्या मालकाने गाडीसंदर्भातील अनेक नियम मोडल्याचं दिसत होतं. गाडीच्या काचाही काळ्या रंगाचा होत्या. तसेच गाडीच्या मागील बाजूस पोलीस अशी अक्षरं लिहिलेली होती. तसेच उत्तर प्रदेश पोलीस दलाचा लोगोही गाडीच्या मागच्या बाजूस लावण्यात आला होता.
नंबर प्लेटच्या लावतात त्या जागी लावण्यात आलेल्या पाटीवर गाडीच्या नोंदणी क्रमांकाऐवजी ठाकुर असं लिहिलेलं. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर येथील स्थानिक पोलीस स्थानकातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाचे आदेश दिले. यानंतर गाडीचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी ही गाडी जप्त केली. तसेच गाडी मालकाला 28 हजार 500 रुपयांचा दंडही ठोठावला. पोलीस उपायुक्त (वाहतूक) दिनेश कुमार पूरी यांनी या गाडीसंदर्भातील माहिती काढण्यात आली असता ही गाडी शारदा सिंह नावाच्या व्यक्तीची मालकीची असल्याचं समजलं. ही गाडी प्रांजल सिंह नावाचा तरुण चालवत होता. हा तरुण त्याचे वडील महाराजगंज पोलीस स्थानकामध्ये पोलीस निरिक्षक म्हणून तैनात असल्याचा दावा केला होता.
सध्या ही गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात उभी करण्यात आली असून 28 हजार 500 रुपयांच्या दंडाची पावती या तरुणाला देण्यात आली आहे. गाडीची नंबर प्लेट काढून त्याजागी काहीतरी लिहणं, काळ्या काचा लावणं हे वाहतूक नियमांचं उल्लंघन आहे. अशाप्रकारच्या गाड्यांवर या पुढेही कारवाई केली जाईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.