सिरसा : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमच्या डेऱ्यामध्ये सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलंय. कोर्टाच्या आदेशानंतर हे सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलंय. या सर्च ऑपरेशनमध्ये तब्बल ५ हजार जवान कार्यरत आहेत.
या सर्च ऑपरेशनमध्ये आतापर्यंत कम्प्युटर, लॅपटॉप, हार्ड डिस्क ताब्यात घेण्यात आल्यात. तसेच या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा आणि प्लास्टिक मनीही ताब्यात घेण्यात आल्यात.
दरम्यान, या सर्च ऑपरेशनमध्ये जंगली प्राणीही आढळल्याची माहिती मिळतेय. डेऱ्यामध्ये सुरु असलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये व्हिडीओग्राफीही केली जात आहे. हायकोर्टाचे माजी न्यायाधीश एके पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्च ऑपरेशन सुरु आहे.
Haryana: Found in markets near Dera Sacha Sauda's Headquarter in Sirsa-"Gurmeet Ram Rahim's plastic currency" pic.twitter.com/ZwhlJtSl70
— ANI (@ANI) 8 September 2017