मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावणाऱ्या फरार हिरेव्यापारी नीरव मोदी याच्या जप्त करण्यात आलेल्या महागड्या कार, लाखो रुपये किंमतीची घड्याळं आणि अन्य महागड्या वस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे. मोदीच्या वस्तूंचे एकूण तीन लिलाव होणार आहेत.
पहिला लिलाव हा २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर, दुसरा लिलाव ३ मार्च आणि चौथा लिलाव ४ मार्च रोजी होणार आहे. हा लिलाव ऑनलाईन होणार आहे. ज्याची जबाबदारी जबाबदारी सैफरन आर्ट्सकडे आहे.
मोदीच्या ज्या गोष्टींचा लिलाव करण्यात येणार आहे, त्यात१५ आर्टवर्कचा समावेश आहे. या आर्टवर्कमध्ये अमृता शेरगिल यांची १९३५मधील कलाकृती आहे. ज्याची किंमत जवळपास १२-१८ कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय एम.एफ. हुसैन यांचं महाभारताशी संबंधित एक तैलचित्र, व्ही.एस. गायतोंडे यांचं १९७२मधील एक चित्र ज्याची किंमत जवळपास ७-९ कोटी रुपयांच्या घरात आहे अशा गोष्टींचा समवेश आहे.
वाचा : ...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी
महागड्या घड्याळांशिवाय मोदीच्या या संपत्तीमध्ये ८० ब्रँडेड हँडबॅगही आहे. लिलाव करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात या वस्तूंविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली. लिलावातील काही वस्तू दिल्लीतील ओबेऱॉय हॉटेलमध्ये इंडिया आर्ट फेअरमध्ये ठेवण्यात येणार आहेत.