नवी दिल्ली : पीएनबी घोटाळ्यानंतर आता सरकार कर्ज घेऊन ते परतफेड न करणाऱ्यांविरोधात कडक कायदा बनवत आहे. यासाठी आज संसदेत फ्यूजिटिव इकोनॉमिक ऑफेंडर्स बिल सादर केलं गेलं.
या नवीन कायद्यामुळे नीरव मोदी, विजय माल्या, मेहुल चौकसी सारख्या कर्ज घेऊन पळून जाणाऱ्या लोकांच्या संपत्तीवर जप्ती आणता येईल. एनपीए वाढण्यामागचं खासगी क्षेत्रात लोकांकडून कर्ज घेऊन ते परत न करणे के मुख्य कारण आहे.
अशा लोकांसाठी फ्यूजिटिव इकोनॉमिक अफेंडर विधेयक तयार करण्यात आलं आहे. याला याआधीच कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यानंतर कर्ज घेऊन पळून जाणाऱ्या लोकांना चांगलाच दणका बसणार आहे.