Funniest Breakup : आपण बरीच वर्षे कोणासोबत रिलेशनशिपमध्ये राहिलो आणि काही कारणांमुळे जेव्हा ब्रेकअप होतो तेव्हा प्रत्येकाला दु: ख होते. काही वेळा बरेच लोक हे दु: ख कोणासोबत शेअर करत नाहीत. मात्र, काही लोक त्यांच्या जवळच्या मित्रांसोबत हे शेअर करत असतात. तेव्हा त्यांचे मित्रच त्यांच्या मदतीला त्यांची साथ देण्यासाठी येतात. अनेकदा तर हे मित्र ब्रेकअपची चेष्टा करतात. ते त्यांच्या मित्राच्या ब्रेकअप विषयीच सगळ्यांना सांगत खिल्ली उडवतात. असाच काहीसा प्रकार एका व्हायरल व्हिडीओमुळे समोर आला आहे. यावेळी एक मुलगी तिच्या ब्रेकअपची बातमी तिच्या मैत्रीनीला सांगत असते आणि ती मुलगी कशा प्रकारे खिल्ली उडवते त्याची ही कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. (girlfriend crying session)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की वंशिका नावाच्या मुलीने तिच्या मैत्रिणीला फोन केला आणि तिच्या बॉयफ्रेंडनं तिच्याशी कशा प्रकारे ब्रेकअप केला हे सांगितले. या दरम्यान वंशिकाच्या मैत्रिणीन तिचा फोन स्पीकरवर ठेवला आणि ऑडिओ कॉल दुसऱ्या फोनवरून रेकॉर्ड केला. ऑडिओ कॉलमध्ये वंशिका तिच्या दोन महिन्याचं रिलेशनशिप कसं संपलं या विषयी सांगताना दिसते.
probably the funniest post-breakup crying session pic.twitter.com/tkac4bbgxs
— isHaHaHa (@hajarkagalwa) December 8, 2022
हेही वाचा : Ram Gopal Varma चं चाललंय काय? आधी अभिनेत्रीच्या पायाला Kiss, आता अप्सरा राणीसोबतचा 'तो' फोटो व्हायरल
वंशिका तिच्या मैत्रिणीनं विचारलं की काय झालं? तेव्हा वंशिका बोलते, 'माझ्या आणि आकाशच्या दोन महिन्यांच्या अॅनिव्हर्सरीसाठी मी थ्रेडिंग, वॅक्सिंग हे सर्व केले होते. एवढं दुखत होतं की पार्लरच्या बाईसमोर मी ओरडू लागले आणि त्या मुलाचा अॅटिट्यूड बघ, म्हणाला मी आपल्या रिलेशनशिपविषयी मला शाश्वती नाही. त्यानंतर वंशिका अनेक गोष्टी तिच्या मैत्रिणीला सांगते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ 9 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. हा संपूर्ण व्हिडीओ 2 मिनिटे 20 सेकंदांचा आहे. हा व्हिडीओ शेअर करत हे सगळ्यात मजेशीर ब्रेकअप सेशन असल्याचं अनेकांनी कमेंट करत म्हटलं आहे. (funniest post breakup crying session with friend on phone video goes viral on social media)