आरोपी म्हणावं की विकृत, चाकूने भोसकून गर्भवती म्हशीची हत्या

 व्यक्तीने चाकूने भोसकून गर्भवती म्हशीची हत्या केल्याची किळसवाणी घटना घडलीय.

Updated: Jun 12, 2022, 09:26 PM IST
 आरोपी म्हणावं की विकृत, चाकूने भोसकून गर्भवती म्हशीची हत्या

गाजियाबाद :  गाजियाबादमधून अजब गजब घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने चाकूने भोसकून गर्भवती म्हशीची हत्या केल्याची किळसवाणी घटना घडलीय. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. 

मुरादनगर भागातील रावली काला गावात प्रमोद कुमार आपल्या कुटुंबासह राहतात. शेती आणि पशुपालनातून ते आपला घराचा गाडा हाकतात. दोन दिवसांपूर्वी चरणजित सिंग यांच्या गोठ्यात त्यांची म्हैस बांधली होती. शुक्रवारी जेव्हा प्रमोद आपल्या म्हशीला चारा देण्यासाठी गेले असता,  त्यांना त्याची म्हैस रक्ताच्या थारोळ्यात सापडली. वेदनेने व्हिवळत ती पडली होती.  

विशेष म्हणजे, प्रमोद यांची म्हैस ही गर्भवती होती. तिचा पोटावर आरोपीने सपासप अनेकदा वार करत तीची हत्या केली. या घटनेची माहिती प्रमोद कुमार यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला.

दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सीसीटीव्हीमध्ये दीपक कुमार नावाचा व्यक्ती त्या वेळी म्हशीजवळ होता. पोलिसांनी दीपकला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. 

आठवडाभरापूर्वी प्रमोद सोबत आरोपीचे प्रमोद सोबत भांडण झाले होते. या प्रमोदला धडा शिकवण्यासाठी त्याने एका म्हशीवर चाकूने वार केल्याचे दीपकने पोलिसांना सांगितले.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x