श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात १० जानेवारी रोजी आठ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी आठ लोकांविरुद्ध चार्जशीट दाखल करण्यात आलीय. ९ एप्रिल रोजी कठुआच्या न्यायालयात सादर करण्यात आलेल्या १५ पानांच्या चार्जशीटमध्ये या घटनेचा मास्टरमाईंड म्हणून रिटायर्ड महसूल अधिकारी संजी राम याचं नाव लिहिण्यात आलंय. दुसरीकडे, सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणीसाठी जम्मू हायकोर्ट बार असोसिएशननं बुधवारी जम्मू बंदचं आवाहन केलंय. बंदच्या समर्थनार्थ काँग्रेस, पँथर्स पार्टीसहीत अनेक सामाजिक संस्थांनी शहरात रॅली काढत निदर्शनं केली.
चार्जशीट दाखल केल्यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि हत्याचा आरोपी संजीराम, त्याचा मुलगा विशाल आणि भाच्याला अटक केलीय. या प्रकरणाच्या चौकशी निगडीत विशेष पोलीस अधिकारी दीपक खजूरिया, सुरिंदर कुमार, प्रवेश कुमार, सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर आणि हेड कॉन्स्टेबल तिलक राज यांना पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीय.