पणजी : देशातील सर्वात छोट पण तितकच महत्त्वाचं राज्य असलेल्या गोव्यामध्ये पुन्हा एकदा भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी तयार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. प्रमोद सावंत यांनी म्हटलंय की, ते 20 हून अधिक जागा जिंकतील. आम्ही महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षासोबत (MGP) सरकार स्थापन करत आहोत. बातमी अशी देखील येत आहे की, भाजप आजच राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई भेटून सरकार स्थापनेचा दावा करणार आहे.
राज्यात सध्या BJP 19 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 12, MGP+ 3 आणि AAP 2 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर 4 जागांवर आघाडीवर आहेत.
पणजी मतदारसंघातून BJP चे उमेदवार अतानासियो मोनसेराटे यांचा 710 मतांनी विजय झालाय. त्याने माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा आणि अपक्ष उमेदवारी उत्पल पर्रिकर यांचा पराभव केलाय.
गोव्यामध्ये भाजपचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कांटे की टक्कर मिळतेय. काँग्रेस उमेदवार आणि त्यांच्यामध्ये जास्त मतांचा फरत नाहीये.
काँग्रेस नेते मायकल लोबो यांनी म्हटलं की, आम्हाला आशा होती की आम्ही जिंकू. पण जनादेशाचा स्वीकार करतो. आम्हाला 12 जागा मिळताना दिसताय. भाजपला 18 जागा मिळाल्या आहेत. आम्ही विरोधी पक्ष म्हणून मजबुतीने काम करु. काँग्रेस लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी आणखी मेहनत घेईल.'