VIDEO : कचरा वेचणाऱ्या महिलेचं फाडफाड इंग्रजी, जापानसोबत काय आहे कनेक्शन?

सोशल मीडियावर महिलेची जोरदार चर्चा 

Updated: Aug 18, 2021, 07:41 AM IST
VIDEO : कचरा वेचणाऱ्या महिलेचं फाडफाड इंग्रजी, जापानसोबत काय आहे कनेक्शन?  title=

मुंबई : बंगलुरूच्या कचरा वेचणाऱ्या महिलेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओ एक महिला चक्क फाडफाड इंग्रजी बोलत आहे. सेसिलिया मार्गरेट लॉरेंस नावाने ही ओळखली जाणारा महिला सदाशिवनगर (Sadashivnagar)मध्ये कचरा वेचताना दिसली. जेव्हा इंस्टाग्राम युझर शचीना हेगर (Shachina Heggar)हीने हा व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत ही महिला चक्क फाडफाड इंग्रजी बोलताना दिसत आहे. 

इन्स्टाग्रावर हा व्हिडीओ itmeshachinaheggar या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी महिला आपण 7 वर्षे जपानमध्ये काम केल्याचं सांगते. या व्हिडीओनुसार, संबंधित महिला सदाशिवनगरच्या आसपास कचरा वेचते. जपानमध्ये 7 वर्ष राहिल्यानंतर ती भारतात परतली. आपली कहाणी सांगत असताना ही महिला गाणेही गाते. तिने आपलं नाव Cecilia Margaret Lawrence सांगितलं. या महिलेचा व्हिडीओ जगासमोर आणून चांगलं काम केलं आहे अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shachina Heggar (@itmeshachinaheggar)

या महिलेचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती फाडफाड इंग्रजी बोलताना दिसत आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ अवघ्या काही वेळातच व्हायरल झाला. नेटीझन्सनी महिलेच्या जीवनशैलीवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. अनेकांनी तिच्या राहणीमानावर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.