भारतात उजवीकडे तर परदेशात डावीकडे का असतं कारचं Steering Wheel? कारण हैराण करणारं

Car Steering Wheel : भारतात चारचाकी वाहनांचं स्टिअरिंग व्हिल नेहमी उजवीकडेच (Right Side) असतं. तर काही परदेशी देशात स्टेअरिंग व्हिल डाव्या बाजूला (Left Side) असतं. वास्तविक या मागे कोणतंही रॉकेट सायन्स नाही तर इंग्रजांशी जोडलं गेलेलं एक कारण आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 22, 2024, 04:55 PM IST
भारतात उजवीकडे तर परदेशात डावीकडे का असतं कारचं  Steering Wheel? कारण हैराण करणारं title=

Car Steering Wheel : आपण वर्षांनूवर्ष एक गोष्ट बघत आलोय ती म्हणजे भारतात चाचाकी वाहनांचं स्टिअरिंग व्हिल नेहमी उजवीकडेच (Right Side) असतं. तर काही परदेशी देशात स्टेअरिंग व्हिल (Steering Wheel) डाव्या बाजूला (Left Side) आहे. यामागे कोणतंही रॉकेट सायन्स नाही. तर याचं कारण जोडलं गेलंय ब्रिटिशांशी. भारतात अनेक वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. 1947 पर्यंत इंग्रजांची भारतावर सत्ता होती. इंग्रजांनी वाहतूक सुरळित व्हावी यासाठी भारतात रस्त्याच्या डाव्या बाजूने चालन्याचा नियम बनवला. 

ब्रिटिश काळात बनला नियम
इंग्लंडमध्ये चारचाकीचा शोध लागल्यापासून स्टेअरिंग उजव्या बाजूला होतं. इंग्रजांनी भारतावर 200 वर्ष राज्य केलं. या वर्षात इंग्रजांनी त्यांच्या देशात लागू केलेले नियम भारतातही आणले. यापैकीच एक म्हणजे चारचाकी वाहनांचं स्टेअरिंग (Steering Wheel) उजव्या बाजूला असणं. ज्या देशात इंग्रजांनी राज्या केलं. त्या त्या देशात चारचाकी वाहनांचं स्टेअरिंग उजव्या बाजूलाच आहे. 

भारतात डाव्या बाजूने चालतात लोकं
वेगवेगळ्या देशात रस्त्यावरुन चालण्याचा नियमही वेगवेगळा आहे. भारतात रस्त्यावरुन डाव्या बाजूने चालण्याचं लहानपणापासून शिकवलं जातं. पण भारत एकटाच देश नाहीए. तर जगातील 76 देशात डाव्या बाजूने तर 163 देशात उजव्या बाजूने चालण्याचा नियम आहे. आता इंग्रजांनी भारतावर सत्ता गाजवलीय, त्यामुळे स्टिअरिंग व्हिल प्रमाणेच रस्त्यावर डाव्या बाजूने चालण्याचा नियमही इंग्रजांनीच आणला. स्वांतत्र्यानंतरही हे नियम बदलण्यात आले नाहीत. 

अमेरिकेत स्टेअरिंग डाव्या बाजूला
भारतात स्टेअरिंग व्हील उजव्या बाजूला आहे, कारण रस्त्यावरुन चालणाऱ्यांना डाव्या बाजूने चालण्याचा नियम आहे. या ऊलट अमेरिकत नियम आहे. अमेरिकेत कारचं स्टेअरिंग डाव्या बाजूला तर लोकांना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्याचा नियम आहे. यामागेही एक खास कारण आहे. 

18 व्या शतकात अमेरिकेत टीमस्टर्सच्या मदीतने घोडागाडी खेचली जात असे. घोडागाडीत चालकाला बसण्याची विशेष अशी व्यवस्था नव्हती. त्यामुळे घोडागाडी चालवताना चालक उजव्या हातात चाबूक धरायचा त्यामुळे तो थोडासा डाव्या बाजूला बसायचा. पुढे ही प्रथाच पडली. त्यानंतर अमेरिकेत कारचा अविष्कार झाल्यानंतर स्टिअरिंग व्हिल डाव्या बाजूलाचा ठेवण्यात आलं. 

चारचाकी वाहनांचा चालक उजव्या बजूला बसल्याने रस्त्यावर डाव्या बाजूने चालणारी लोकं आरशात सहज दिसू शकतात.