GK Quiz: असा कोणता जीव आहे, जो 2 वर्ष न खाता-पीता जिवंत राहू शकतो?

GK Quiz : आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. स्पर्धात्मक परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतीसाठी या प्रश्नांची उजळणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमचं सामान्य ज्ञान मजबूत होण्यासही मदत होईल.   

राजीव कासले | Updated: Oct 3, 2024, 06:31 PM IST
GK Quiz: असा कोणता जीव आहे, जो 2 वर्ष न खाता-पीता जिवंत राहू शकतो? title=

GK Quiz : आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. स्पर्धात्मक परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतीसाठी या प्रश्नांची उजळणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमचं सामान्य ज्ञान मजबूत होण्यासही मदत होईल. अशा पद्धतीचे प्रश्न रेल्वे, बँक किंव इतर स्पर्धात्मक परीक्षेत हमखास विचारले जातात. अशा वेळी या प्रश्नांची उत्तरं पाठ करुन परीक्षेत चांगला स्कोर करण्याची संधी ठरु शकतो. हे प्रश्न नोट करुनही ठेवता येईल.

प्रश्न - मावळत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात?

उत्तर - नॉर्वे या देशाला मावळत्या सूर्याचा देश असं म्हटलं जातं

प्रश्न - कोणत्या देशात लठ्ठ असणं बेकायदेशीर मानलं जातं?

उत्तर - जपाना या देशात लठ्ठ असणं बेकायदेशीर मानलं जातं?

प्रश्न - ग्रेनाईटने बनवलेलं भारतातलं पहिलं मंदिर कोणत्या राज्यात आहे?

उत्तर - तामिळनाडूच्या तंजोरमध्ये बृहदेश्वर मंदिर आहे. ग्रेनाईटने बनवलेलं देशातील हे पहिलं मंदिर आहे. 11 व्या शतकात हे मंदिर उभारण्यात आल्याचं सांगितलं जातं.

प्रश्न - कोणत्या प्राण्याला हार्ट अटॅक येऊ शकतो?

उत्तर - प्राण्यालाही हार्ट अटॅक येऊ शकतो, ह्रदयासंबंधीचे आजार मनुष्य आणि चिम्पांजी यांच्यात समान आहेत.

प्रश्न - पृथ्वीराज चौहान यांची राजधानी कोणती होती?

उत्तर - पृथ्वीराज तृतीय ज्यांना पृथ्वीराज चौहान नावाने ओळखलं जात होतं. ते भारतातील सर्वात शक्तीशाली योद्धांपैकी एक होते. त्यांची राजधानी अजयमेरु म्हणजे आताची राजस्थानमधील अजमेर ही होती.

प्रश्न - असा कोणता जीव आहे, जो 2 वर्ष न खाता-पीता जिवंत राहू शकतो?

उत्तर - दोन वर्ष न खाता-पीता राहू शकणारा दुर्मिळ जिवांपैकी एक आहे सालामेंडरस (Salamanders). हा जीव पाण्याच्या आत गुफांमध्ये आढळतो.