GK Quiz : भाज्यांचा राजा बटाटा मग राणी कोण? सांगा उत्तर

GK Quiz in Hindi : आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय सामान ज्ञानावर आधारीत प्रश्नमंजुषा. या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला स्पर्धात्मक परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतीसाठी उपयोगी ठरु शकतात.

राजीव कासले | Updated: Sep 20, 2024, 08:34 PM IST
GK Quiz : भाज्यांचा राजा बटाटा मग राणी कोण? सांगा उत्तर  title=

GK Quiz Today Current Affairs: सामान्य ज्ञान, ज्याला इंग्रजीत जनरल नॉलेज म्हटलं जातं. हा असा शब्द आहे जो वेगवेगळ्या विषयांबद्दलच्या सामान्य ज्ञानाचं वर्णन करण्यासाठी वापरला जातो. सामान्य ज्ञानामध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान, कला, साहित्य, क्रीडा चालू घडामोडी आणि इतर विषयांचा समावेश असतो. सामान्य ज्ञान वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे नियमितपणे बातम्या वाचणे आणि वर्तमानपत्रे तसंच मासिके पाहणं. तुम्ही पुस्तके, लेख आणि ब्लॉग देखील वाचू शकता. सामान्य ज्ञान वाढवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे क्विझ खेळणे आणि कोडी सोडवणे.

आज आम्ही तुमच्यासाठी पुन्हा एकदा सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न घेऊन आलो आहोत. ज्याची उत्तरं तुम्हाला येतात का हे तपासा.

प्रश्न - भारताचं प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हटलं जातं?

उत्तर - मुंबई या शहराला भारताचं प्रवेशद्वार म्हटलं जातं

प्रश्न - जगातल्या कोणत्या देशात यूट्यूबवर बंदी आहे?

उत्तर - चीनमध्ये यूट्यूबवर बंदी आहे.

प्रश्न - सिंहाच्या आधी जंगलाचा राजा कोणत्या प्राण्याला म्हटलं जात होतं?

उत्तर - सिंहाच्याआधी हत्तीला जंगालाचा राजा मानलं जात होतं.

प्रश्न - चिंचेचा चहा प्यायल्याने कोणता आजार बरा होतो?

उत्तर - चिंचेचा चहा प्यायल्याने मेटाबॉलिक सिंड्रोम बरा होतो.

प्रश्न - वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला होता?

उत्तर - वाफेच्या इंजिनचा शोध टामस न्यूकोमेन यांनी लावला होता.

प्रश्न - कोणत्या देशात फोटो काढणं गुन्हा मानलं जातं?

उत्तर - तुर्कमेनिस्तान देशात फोटो काढणं गुन्हा मानलं जातं?

प्रश्न - भाज्यांचा राजा बटाटा मग राणी कोण?

उत्तर - बटाटा हा भाज्यांचा राजा मानला जातो. तर मिरचीला भाज्यांची राणी म्हणतात