Quiz: अशी कोणती गोष्ट आहे जी वर्षातून एकदा, महिन्यातून 2, आठवड्यातून 4 आणि दिवसातून 6 वेळा येते?

General Knowledge Quiz : दररोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळाही गरजेचा असतो. यासाठीच आज आम्ही तुमच्या साठी एक प्रश्नमंजुषा घेऊन आलोय. या प्रश्नांची उत्तरं मजेशीर पण तितकीच विचार करायला लावणारी आहेत. 

राजीव कासले | Updated: Jun 7, 2024, 08:30 PM IST
Quiz: अशी कोणती गोष्ट आहे जी वर्षातून एकदा, महिन्यातून 2, आठवड्यातून 4 आणि दिवसातून 6 वेळा येते? title=

General Knowledge Quiz : दररोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळाही गरजेचा असतो. मोठ्यांना कामातून तर छोट्यांना अभ्यासातून वेळच मिळत नाही. कामाच्या आणि अभ्यासाच्या ताणामुळे काही वेगळं करण्याची संधीच मिळत नाही. यासाठीच आज आम्ही तुमच्या साठी एक प्रश्नमंजुषा घेऊन आलोय. या प्रश्नांची उत्तरं मजेशीर पण तितकीच विचार करायला लावणारी आहेत. आपल्या सर्वांनाच माहित आहे सध्याचा जमाना हा शर्यतीचा आहे. शर्यतीत पुढे राहाण्यासाठी आपल्या ज्ञानात भर टाकण्याची गरज आहे. यासाठी सामान्य ज्ञान (General Knowledge) हे खूप महत्त्वाचं आहे. आज आम्ही तुम्हाला असेच काी प्रश्न विचारणार आहोत, जे कदाचित तुम्ही याआधी कधी ऐकले किंवा वाचले नसतील. 

आम्ही काही प्रश्न विचारणार आहोत, ती प्रश्न वाचून त्याची उत्तर तुम्हाला येतात का याचा आधी विचार करा, तुमच्या माहितीसाठी या प्रश्नांच्या खाली उत्तरंही देण्यात आली आहेत. 

प्रश्न 1 - ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली होती.
उत्तर - ब्राम्हो समाजाची स्थापना समाजसुधारक राजा राम मोहन राय (Raja Ram Mohan Rai) यांनी केली होती.

प्रश्न 2 - 'वेदांकडे परत या' असे कोणी म्हटलं होतं?
उत्तर - स्वामी दयानंद सरस्वती (Swami Dayanand Saraswati) यांनी हे आवाहन केलं होतं.

प्रश्न 3 - वास्को दी गामा भारतात कधी आला होता?
उत्तर - वास्को दी गामा भारतात 1498 साली आला होता.

प्रश्न 4 - ईस्ट इंडिया कंपनी ज्या जहाजातून भारतात आली, त्या जहाजाचं नाव काय होतं?
उत्तर - ईस्ट इंडिया कंपनी ज्या जहाजातून भारतात आली होती, त्या जहाजाचं नाव  Red Dragon असं होतं.

प्रश्न 5 - अशी कोणती गोष्ट आहे जी वर्षातून एकदा, महिन्यातून 2, आठवड्यातून 4 आणि दिवसातून 6 वेळा येते?
उत्तर - या प्रश्नाचं उत्तर  इंग्रजी लेटर 'F' असं आहे. याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर सांगतो.

वास्तविका वर्षाचे बारा महिने असतात  (January, February, March, April, May, June, July, August, September, October, November, December) या बारा महिन्यांपैकी February या महिन्यात 'F' लेटर येतं. 

अशाच प्रकारे एका महिन्यात चार आठवडे येतात, (First Week, Second Week, Third Week, Fourth Week) या चार आठवड्यांपैकी  First Week आणि Fourth Week मध्ये 'F' लेटर येतं. 

आठवड्यातून तीन वेळा, म्हणजे आठवड्यात सात दिवस असतात (First Day, Second Day, Third Day, Fourth Day, Fifth Day, Sixth Day and Seventh Day). या सात दिवसात First Day, Fourth Day  आणि Fifth Day  यात 'F' लेटर येतं.

अशाच प्रकारे दिवसातून 6 वेळा म्हणजे, दिवसात 24 तास असतात (One, Two, Three, Four, Five, six, Seven, Eight, Nine, Ten..... Fourteen, Fifteen........ Twenty Four) यात 'F' हे लेटर सहावेळा येतं.