Petrol-Diesel महाग झालंय, असं मिळवा ५० लीटर पेट्रोल मोफत

देशामध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पेट्रोल प्रती लीटर १०० रुपयांवर गेलं आहे. अर्थमंत्री

Updated: Feb 24, 2021, 06:04 PM IST
 Petrol-Diesel महाग झालंय, असं मिळवा ५० लीटर पेट्रोल मोफत title=

मुंबई : देशामध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पेट्रोल प्रती लीटर १०० रुपयांवर गेलं आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामण, रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांचे म्हणणे आहे की, कर (टॅक्स) कपात करु, पण याने दिलासा मिळेल का ? हे यावरुन सांगता येणार नाही. 

५० लीटर पेट्रोल मिळणार मोफत!

आता नाराज होण्याची काही गरज नाही, कारण एक अशी योजना आहे, ज्यामुळे आपण वर्षभर ५० लीटर पेट्रोल मोफत मिळवू शकतो. पण तुमच्याकडे इंडियन ऑईल एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड (Indian Oil HDFC Bank Credit Card) असाव.तुम्ही त्या कार्डने पेमेंट करा. एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार या क्रेडिट कार्डच्या खरेदीनंतर तुम्हाला फ्यूल पॉइट मिळतील.

खरेदीनंतर असे मिळणार पॉइट...

जेव्हा आपण या क्रेडिट कार्डवर पेट्रोल खरेदी करता, तेव्हा जेवढे पेट्रोल खरेदी करता त्यांचे ५ परसेंट तुम्हाला फ्यूल पॉइट स्वरूपात मिळेल. इंडियन ऑईल आउटलेटवर पहिल्या ६ महिन्यामध्ये प्रत्येक महिनाला जास्तच जास्त ५० फ्यूल पॉइट्स मिळतील. 

तु्म्ही ६ महिन्यानंतर १५० फ्यूल पॉइट मिळवू शकतात. तसेच याशिवाय दुसरी शॉपिंग १५० रूपय इतकी खरेदी केली.  तर १ फ्यूल पॉइट मिळवता येतो. या  फ्यूल पॉइटसला रिडीम करून तुम्ही वर्षाला ५० लीटर एवढं  डिझेल- पेट्रोल मिळवू शकता.

Indian Oil HDFC Bank Credit Card ची फी

पण हे कार्ड तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार नाही. या क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना तुम्हाला सदस्य फी म्हणून ५०० रूपये आणि GST द्यावा लागेल. या कार्डसंबंधित सर्व अधिकार बँकेकडे राखीव असतील. या कार्डासाठी २१ वर्ष ते ६० वर्षापर्यंत ग्राहक अर्ज करू शकतात. 

जर तुम्ही नोकरी करता तर तुमचे मासिक उत्पन्न कमीत कमी १० हजार रूपये हवे. जर तुमचे क्रेडिट कार्ड हरवले, तर २४ तासांच्या आत बँकेशी संर्पक साधावा. नवीन कार्डसाठी तुमच्याकडून कोणतीही फी आकारण्यात येणार नाही.

या शहरामध्ये ही ऑफर नाही

या  क्रेडिट कार्डची सुविधा काही मोजक्या शहरांसाठी आहे. जर तुम्ही बेंगलोर, चेन्नई, दिल्ली, गुरूग्राम, मुंबई (ठाणे, वाशी सहित), पुणे, हैदराबाद (सिकंदराबाबत सहित) येथे राहत असाल तर तुम्ही ही ऑफर वापरू शकत नाही. 

एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जर आपण व्यवसाय करत असाल तर आपले किमान वार्षिक उत्पन्न  ६ लाख रुपये असेल तरच आपण या कार्डसाठी अर्ज करू शकता.