Elephant Viral Video: जंगल सफारी आणि जंगली प्राण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. जेव्हा वाघ आणि सिंह प्राण्यांचे शिकार करतात असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. याशिवाय जेव्हा पर्यटक जंगल सफारी जातात तेव्हाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. अशा एका जंगल सफारीला गेलेल्या तरुणींचा व्हिडीओ सोशल मीडिया ट्रेंडिंगमध्ये आहे. या व्हिडीओमध्ये तरुणीने असं काही कृत्य केलं की गजराजला राग आला आणि त्याने... (girls shouting jumbo elephant angry jungle safari viral video trending google now)
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मुलींचा एक ग्रुप जंगल सफारीसाठी गेले आहे. जीपमधून त्या जंगल सफारीवर असताना त्यांना मोठा हत्ती दिसतो. तर त्या जीपमधील एका तरुणीने मोबाईल कॅमेऱ्यात हत्तीला कैद करायला घेतलं. तरुणीचं हे कृत्य पाहून गजराजाला राग आला आणि तो जीपच्या मागे धावू लागला.
हा व्हिडीओ सुशांत नंदा यांनी ट्वीटवर शेअर केला आहे. त्यांनी तरुणीच्या या कृत्यावर आक्षेप व्यक्त केला आहे. ''जे लोक हत्तीला घाबरतात, त्यांना विचार की ते जंगलात का जातात?''
If one is so afraid of seeing an elephant in a safari vehicle, why do they venture into the forest & yell so loudly?
Behave as humans & be sober & humble in jungle safaris. pic.twitter.com/6EeLROSy94— Susanta Nanda (@susantananda3) May 10, 2023
जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना अनेक नियम सांगण्यात आले आहेत. जंगलात गेल्यावर शांत आणि विनम्रपूर्वक वागण्याचा सल्ला दिली जाते. मात्र काही पर्यटक जंगलातील शांतता भंग करतात आणि जंगली प्राण्यांना त्रास देतात. या व्हिडीओला आतापर्यंत 40 हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे.