नवी दिल्ली : युनिवर्सल अकाऊंट नंबर पोर्टलवर रजिस्टर सदस्य आता ईपीएफओबद्दलची माहिती एका मिस कॉलमध्ये मिळवू शकतो. ही माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला 011-22901406 या नंबरवर मिस कॉल द्या. मात्र या सुविधेचा लाभ घेण्यासाठी युनिफाईड पोर्टलचे युएएन सक्रिय असणे आवश्यक आहे. 011-22901406 या नंबरवर रजिस्टर मोबाईलवरुन फोन केल्यास फोन आपोआप कट होईल. सदस्यांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध आहे.
जर सदस्याचे युएएन कोणत्याही एका बॅंक खात्याशी, आधार कार्डशी आणि पॅन कार्डशी जोडलेले असल्यास सदस्याला भविष्य निधी बचतीची माहिती मिळू शकेल. मिस कॉल आणि एसएमएस च्या माध्यमातून माहिती प्राप्त करण्याची सुविधा उमंग अॅपवर उपलब्ध आहे.
यूएएन सक्रिय सदस्य आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरुन 77382-99899 या नंबरवर एसएमएस पाठवून ईपीएफओकडे उपलब्ध बचत आणि पीएफ योगदानाची माहिती मिळवू शकतात. त्यासाठी ईपीएफओएचओ यूएएन लिहुन 77382-99899 या नंबरवर पाठवा. ही सुविधा १० भाषांत उपलब्ध आहे. इंग्रजी, हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलगु, तामिळ, मल्याळम आणि बांग्ला या भाषांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. इंग्रजीसोडून इतर कोणत्याही भाषेत एसएमएस प्राप्त करण्यासाठी निवडलेल्या भाषेचे पहिले तीन शब्द युएएननंतर लिहावे.