मुख्यमंत्र्यांचे महिलांना मोठे गिफ्ट, केली या नव्या योजनेची घोषणा

गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. हा शपथविधी पूर्ण होताच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक मोठी घोषणा केली आहे.  

Updated: Mar 29, 2022, 03:00 PM IST
मुख्यमंत्र्यांचे महिलांना मोठे गिफ्ट, केली या नव्या योजनेची घोषणा title=

पणजी : गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. हा शपथविधी पूर्ण होताच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक मोठी घोषणा केली आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर विश्वजीत राणे, मॉविन गुदिन्हो, नीलेश काब्राल, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, गोविंद गावडे, रोहन खंवटे आणि बाबूश मोन्सेरात यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. 

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत गोव्यात स्वयंपूर्ण गोवा, सरकार तुमच्या दारी, स्वयंपूर्ण युवा आणि स्वयंपूर्ण महिला या मोहिमांची घोषणा केलीय. तसेच, तरुणांसाठी नोकऱ्या निर्माण करण्यावर भर देण्यात असल्याचे आश्वासन दिले आहे.

गोव्याला स्वयंपूर्ण बनवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. लवकरात लवकर खाण व्यवसाय सुरू करणे. तसेच, रोजगार निर्मिती करून राज्यातील पर्यटनाला आणखी बळकटी देण्याची हमी देतानाच जाहिरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने भाजप सरकार पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या एप्रिलपासून गोवेकरांना वर्षाला 3 LPG सिलेंडर मोफत देण्याचा महत्वाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत घेण्यात आला. ही योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.