महाराष्ट्रापाठोपाठ गोवा राजकीय भुकंपाच्या उंबरठ्यावर, कॉग्रेसने घेतला विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा

गोव्यातील काँग्रेस आमदार (Congress MLA) भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. 

Updated: Jul 10, 2022, 09:39 PM IST
महाराष्ट्रापाठोपाठ गोवा राजकीय भुकंपाच्या उंबरठ्यावर, कॉग्रेसने घेतला विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा title=

पणजी : महाराष्ट्रात सत्तांतर दरम्यान झालेल्या राजकीय भूकंपाप्रमाणेच आता गोव्यातही राजकीय भूकंपाचे वारे वाहू लागले आहेत. गोव्यातील काँग्रेस आमदार (Congress MLA) भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. या चर्चेमुळे आणि कॉग्रेसच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने गोवा कॉग्रेसने मायकल लोबो यांची विरोधी पक्षनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. एआयसीसी गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी या संदर्भातली घोषणा केली.

गोवा काँग्रेसचे काही आमदार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या घरी पोहोचले आहेत. त्यात विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यासह राजेश फलदेसाई, केतन नाइक यांची नावे होती. या भेटीआधी आणि नंतर सुद्धा गोव्यात कॉग्रेस आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती.

आज गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिववेशनाबाबत रणनिती बनवण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या बैठकीला काँग्रेसच तीन आमदार गैरहजर राहिल्यामुळे हे आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चेला आणखीणच गती मिळाली होती. त्यामुळे काँग्रेसने मायकल लोबो यांची विरोधी पक्षनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे.एआयसीसी गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी या संदर्भातली घोषणा केली.

भाजप प्रवेशाची चर्चा 

गोव्यातील काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर आहेत. भाजपमध्ये प्रवेशासाठी हे आमदार आज रात्री दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेसचे किती आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही. महत्वाची बाब म्हणजे विरोधी पक्षनेते मायकल लोबो  यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्यावर ठाम असल्याचं कळतंय.