नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी या धोकादायक विषाणूवर मात करणाऱ्याची संख्या देखील मोठी आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊन घोषित केला. परंतु सलग तीन महिन्याच्या लॉकडाऊननंतर आता देश अनलॉकच्या मार्गावर आहे. अनलॉकची प्रक्रिया आता संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांची आवडतीची ठिकाणं सरकारने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत गोवा, हिमाचल आणि उत्तराखंड पर्यटनासाठी खुले करून देण्यात आले आहे. त्यामुळ पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मार्च महिन्यापासून देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.
कोरोनामुळे देशाचा आर्थिक विकास देखील मंदावला आहे. या धोकादायक विषाणूचा फटका सर्वच उद्योगांना बसला असून देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. मात्र आता अनलॉकच्या माध्यमातून देश पुन्हा एकदा विकासाच्या मार्गाने वाटचाल करत आहे.
गोव्यातील पर्यटकांसाठी नियम
- गोव्यामध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला कोरोना चाचणीचे रिपोर्ट दाखवणं सक्तीचं असणार आहे.
- ज्या हॉटेलमध्ये तुम्ही राहणार आहात, त्यासाठी तुम्हाला प्रि-बुकिंग करावी लागणार आहे.
- गोव्यात दाखल झाल्यानंतर हॉटल शोधण्यासाठी फिरण्याची परवानगी नाही.
- जर तुम्ही कोरोना रिपोर्ट विसरले असाल, तर तुमची राज्यात चाचणी करण्यात येईल.
- जर तुमचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास तुम्हाल राज्यातच क्वारंटाइन करण्यात येईल.
हिमालयातील पर्यटकांसाठी नियम
- हिमालयात फिरण्यासाठी तुमचे कोरोना रिपोर्ट तीन दिवस जुने असायला हवे.
- या ठिकाणी तुम्हाला खासगी कारने प्रवास करावा लागेल.
- हिमालयात प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला तुमचं वाहन रजिस्टर करावं लागेल.
- शिवाय कमीत कमी ५ दिवसांसाठी हॉटेलचं भाडं द्यालं लागेल.
उत्तराखंड
- उत्तराखंडमध्ये फिरण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पास गरजेचा असणार आहे. त्यासाठी https://smartcity dehradun.uk.gov.in या संकेस्थळावर अर्ज भरू शकता.
- याठिकाणी तुम्हाला कमीत कमी ७ दिवसांसाठी हॉटेलचं बुकिंग करावं लागेल.
- बद्रीनाथ आणि केदारनाथमध्ये सध्या बाहेरील राज्यातील पर्यटकांना प्रवेश नाही.
- हरिद्वार आणि ऋषिकेश येथे प्रवेशासाठी ४ तासांची परवानगी गेण्यात आली आहे.