लागोपाठ तिसऱ्या आठवड्यात सोनं झालं स्वस्त, चांदीही घसरली

सोन्यांच्या किंमतीत लागोपाठ तिसऱ्या आठवड्यात घसरण झाली आहे. स्थानिक बाजारात मागणी कमी झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात देखील मागणी कमी झाल्याने सोन्याचा भाव कमी झाला आहे. दिल्लीमध्ये मागच्या आठवड्यात सोन्याचे भाव 190 रुपयांनी कमी झाले होते. 30,780 रुपये प्रति ग्रॅम सोनं पोहोचलं होतं. दुसरीकडे चांदी देखील 30 रुपयांनी कमी झाली. चांदीचा भाव 39,225 रुपये प्रति किलो झाला आहे.

Updated: Jul 29, 2018, 04:22 PM IST
लागोपाठ तिसऱ्या आठवड्यात सोनं झालं स्वस्त, चांदीही घसरली title=

मुंबई : सोन्यांच्या किंमतीत लागोपाठ तिसऱ्या आठवड्यात घसरण झाली आहे. स्थानिक बाजारात मागणी कमी झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात देखील मागणी कमी झाल्याने सोन्याचा भाव कमी झाला आहे. दिल्लीमध्ये मागच्या आठवड्यात सोन्याचे भाव 190 रुपयांनी कमी झाले होते. 30,780 रुपये प्रति ग्रॅम सोनं पोहोचलं होतं. दुसरीकडे चांदी देखील 30 रुपयांनी कमी झाली. चांदीचा भाव 39,225 रुपये प्रति किलो झाला आहे.

सोन्याच्या भावात मोठी घसरण

सूत्रांनी म्हटलं की, मागणी कमी झाल्याने सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोनं 1,223.20 डॉलर प्रति औंस तर चांदी 15.47 डॉलर प्रति औंसने घसरली. शेअर बाजाराने मोठी उसळी घेतल्यानंतर गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध झाल्याने देखील सोन्याचे भाव कमी झाले आहेत.

190 रुपयांनी घसरण 

राष्ट्रीय राजधानीत 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं अनुक्रमे 30,740 रुपये आणि 30,590 रुपये झालं आहे.

चांदीही झाली स्वस्त

सोन्याप्रमाणे चांदीचे भाव देखील कमी झाले आहेत. चांदी 30 रुपयांनी स्वस्त झाली आहे. चांदी 39,225 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.