युपीत मोदींकडून ६० हजार कोटींच्या योजनांचे धडाक्यात उद्घाटन

एस्सेल समुहाने या योजनांमध्ये तीन हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. 

Updated: Jul 29, 2018, 03:55 PM IST
 युपीत मोदींकडून ६० हजार कोटींच्या योजनांचे धडाक्यात उद्घाटन title=

लखनऊ: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी लखनऊ येथे ६० हजार कोटींच्या योजनांचे उद्घाटन झाले. लखनऊच्या इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेशातील गुंतवणुकदारांच्या परिषदेत ४ लाख ६८ हजार कोटींच्या गुंतवणुकीचं लक्ष्य ठेवण्यात आले आहे.  त्यापैकी ८१ योजनांसाठी ६१ हजार कोटींच्या गुंतवणुकीच्यादृष्टीने आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरुवात झालीय. 
  
  या परिषदेमध्ये राज्यसभेचे खासदार आणि  एस्सेल समूहाचे शिल्पकार, मार्गदर्शक डॉ. सुभाष चंद्रांनीही मार्गदर्शन केलं. एस्सेल समुहाने या योजनांमध्ये तीन हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. या योजनांच्या माध्यमातून १० लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. ई-रिक्षा, ऑटो रिक्षाच्या योजनेमध्ये १७५० कोटींची गुंतवणूक असून या माध्यमातून ५० हजार जणांना रोजगार मिळणार आहे.