मुंबई : सध्या लग्नांचा सीजन सुरु आहे. अशातच या दरम्यान सर्वाधिक मागणी असते ती सोने आणि चांदीची. पण सध्या याची मागणी कमी झाली आहे. त्यामुले सोन्याचे दर कमी झाले आहेत.
स्थानीक सर्राफांकडून कमी मागणीमुळे सोन्याचा भाव १०० रुपयांनी कमी झाला आहे. सोन्याचा भाव हा २९,६५० रुपयांवर येऊन पोहोचला आहे. डिसेंबरच्या पहिल्या ९ दिवसात सोनं एकूण ७५० रुपयांनी कमी झालं आहे.
चांदीचा भाव २०० रुपयांनी वाढला आहे. सध्या चांदीचा भाव ३७९०० रुपये आहे. डिसेंबरच्या पहिल्या ९ दिवसांमध्ये चांदीचा भाव १४२५ रुपयांनी कमी झाली होती.
दिल्लीमध्ये ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा भाव २९६५० रुपये तर ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचा भाव ३९५०० रुपये झाला आहे. गेल्या ३ दिवसात सोनं ५०० रुपयांनी कमी झालं आहे. दुसरीकडे चांदी २०० रुपयांनी वाढून ३७९०० रुपये झाला आहे.