दागिने खरेदीची सुवर्णसंधी, आज स्वस्त झाले सोन्याचे दर; वाचा एक तोळ्याचा भाव

Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. काय आहेत आजचे दर जाणून घ्या

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 13, 2024, 12:05 PM IST
दागिने खरेदीची सुवर्णसंधी, आज स्वस्त झाले सोन्याचे दर; वाचा एक तोळ्याचा भाव
gold price today 13th December gold silver price see down on MCX

Gold Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. मात्र आता सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. सोनं आणि चांदीत आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी घट झाली आहे. वायदे बाजारात आज सोनं-चांदी स्वस्त झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं गेल्या 5 आठवड्याच्या उच्चांकी दरावरुन घसरण झाली आहे. ग्लोबल मार्केटमध्ये सोनं $2700 रुपयांच्या जवळपास आहे. गुरुवारी सोन्याच्या किंमतीत 1 टक्क्यांची घट झाली आहे. MCXवर सोनं 78,000 हजारांपर्यंत पोहोचले आहे तर चांदीदेखील 92,000 पर्यंत घसरली आहे. डॉलरच्या मजबुतीकरणामुळं सोन्या-चांदीच्या दरांवर परिणाम होताना दिसतोय.

Add Zee News as a Preferred Source

आज 24 कॅरेट सोनं 600 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं 78,870 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, चांदी 343 रुपयांनी घसरून 92,290 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. चीनच्या मध्यवर्ती बँकेने पुन्हा एकदा सोन्याच्या साठ्यात वाढ केल्याने पुन्हा एकदा मागणी वाढली असल्याचे बोललं जातंय. तसंच, भारतात आता लग्नसराईला सुरुवात झाली आहे. त्यामुळंदेखील सोन्याची मागणी वाढली आहे. 

आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 550 रुपयांची घट झाली असून 72,300 रुपयांवर सोनं पोहोचलं आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 450 रुपयांनी स्वस्त झाल्याने 59,160 रुपयांवर पोहोचलं आहे. 
24 कॅरेट सोनं 600 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं 78,870 रुपयांवर पोहोचलं आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  72,300 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  78,870 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  59,160 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,230 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,887 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 916 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   57,840 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   63, 096 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    47,328 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-72,300 रुपये
24 कॅरेट 78,870 रुपये
18 कॅरेट- 59,160 रुपये

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More