दागिने खरेदीची सुवर्णसंधी; घटस्थापनेच्या आधीच सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या 24 कॅरेटचे दर

Gold Price Today: पितृपक्ष सुरू असतानाच सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. नवरात्री आधीच सोनं स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.  

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 19, 2024, 12:03 PM IST
दागिने खरेदीची सुवर्णसंधी; घटस्थापनेच्या आधीच सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या 24 कॅरेटचे दर  title=
gold price today retail prices fall check latest 22 and 24 carat price on 19 september

Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात रेकॉर्डब्रेक घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारी पहिल्यांदा सोनं 2600 डॉलरच्या उच्चांकावर वधारले होते. मात्र, त्यानंतर मौल्यवान धातुच्या दरात घट झाली होती. आज गुरुवारी 19 सप्टेंबर रोजी वायदे बाजारात मोठी घट झाली आहे. सराफा बाजारातही सोनं-चांदीच्या दरात घाट झाली आहे. लवकरच नवरात्र व दिवाळी या सणांना सुरुवात होणार आहे. त्याआधीच सोन्याच्या दरात घट होत असल्याने ग्राहकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. 

आज सकाळी MCXवर सोनं 280 रुपयांनी घसरलं आहे. त्यानंतर 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 74,450 रुपयांवर स्थिरावलं आहे. सोनं 75 हजारांच्या खाली आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवाच्या काळात सोन्यानं 75 हजारांचा पल्ला गाठला होता. मात्र आता सोन्याने भाव कोसळले आहेत. तर, चांदीच्या दरातही किंचितशी घसरण झाली आहे. चांदी आज 30 रुपयांनी घसरली असून 88,269 रुपये प्रतिकिलोग्रॅमवर स्थिरावली आहे. तर, काल चांदी 88,299 रुपयांवर स्थिरावली होती. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 2600 डॉलरने उसळले होते. त्यानंतर  40 डॉलरने घसरण झाली होती. तर, चांदी जवळपास 2 टक्क्यांनी घसरून 30 डॉलरच्या आसपास पोहोचली होती. आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 250 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा 68,250 रुपयांवर पोहोचले आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 210 रुपयांची घसरण झाली असून प्रतितोळा सोनं 55,840 रुपयांवर पोहोचले आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  68,250 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  74,450 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  55,840 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6,825 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 445 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 584 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   54, 600 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   59, 560 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    44, 672 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 68,650 रुपये
24 कॅरेट- 74,890 रुपये
18 कॅरेट- 56,170 रुपये