मुंबई : दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होताच, सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सातत्याने वाढ होत असतानाही सोने विक्रमी उच्चांकापेक्षा खूपच स्वस्त मिळत आहे. अशा परिस्थितीत तुम्हालाही खरेदी करायची असेल तर लवकर करा. आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमतीत 0.34 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी चांदीच्या दरात 0.96 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
विक्रमी उच्चांकापेक्षा 8 हजार रुपयांनी सोने स्वस्त
ऑगस्ट 2020 मध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याने 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज डिसेंबर future वर MCX वर सोने 48,123 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आहे. म्हणजेच ते अजूनही सुमारे 8077 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.
मुंबईतील सोन्याचे दर
29 नोव्हेंबर 48,310 रुपये प्रति तोळे
28 नोव्हेंबर 48,320 रुपये प्रति तोळे
27 नोव्हेंबर 48,310 रुपये प्रति तोळे
26 नोव्हेंबर 47,940 रुपये प्रति तोळे
मुंबईतील चांदीचे दर 62,700 प्रति किलो असून आज चांदीच्या दरांमध्ये कालपेक्षा 700 रुपयांनी वाढ नोंदवण्यात आली.
अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care app'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही. तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.