दागिने खरेदीची सुवर्णसंधी! आज सोन्याचे भाव उतरले; 24 कॅरेटचे भाव जाणून घ्या

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोनं खरेदीची ही चांगली संधी आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 6, 2024, 07:23 PM IST
दागिने खरेदीची सुवर्णसंधी! आज सोन्याचे भाव उतरले; 24 कॅरेटचे भाव जाणून घ्या title=
Gold Rate Today 5th Jun 2024 check latest price of gold and silver in maharashtra

Gold Price Today: कमोडिटी बाजारात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. आंतराराष्ट्रीय बाजारात मंगळवारी सोनं 1 टक्क्यांनी घसरलं आहे. तर, आज वायदे बाजारात सोनं-चांदीच्या किंमतीत घट झाली आहे. सकाळी MCXवर गोल्ड फ्यूचर 220 रुपयांनी घसरले आहे. तर, चांदी 124 रुपयांनी चमकली आहे. मागच्याच आठवड्यात चांदीने 96,220 रुपयांचा रेकॉर्डब्रेक वाढ नोंद केली होती. मात्र, आता चांदीचे भाव चांगलेच कोसळले आहेत. चांदी आता 90 हजारांनी खाली उतरली आहे. 

सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे. सोमवार व मंगळवार या दोन दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली होती. मात्र, आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घट झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 72,650 इतके आहेत. तर. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 220 रुपयांची घसरण झाली आहे. तर, एकीकडे 22 कॅरेट सोन्याच्या दरात 200 रुपयांची घट झाली असून आज 22 कॅरेट सोन्याचा दर 66,600 इतका आहे. 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याचा दर 7,265 रुपये इतका आहे. 

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट   66, 600 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट   72, 650  रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   54, 490 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6,660 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,265 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 449 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   53, 280 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   58,120 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    54,490  रुपये

Gold Rate Today 6 June: सोन्याचा दरात आज पुन्हा वाढ, 24, 22 व 18 कॅरेट सोन्याचे भाव जाणून घ्या!

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट-  66, 600 रुपये
24 कॅरेट-  72, 650  रुपये
18 कॅरेट- 54, 490 रुपये