सोन्याचा दरात आज पुन्हा वाढ, 24, 22 व 18 कॅरेट सोन्याचे भाव जाणून घ्या!

Gold Price Today: कमोडिटी बाजारात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 6, 2024, 11:32 AM IST
सोन्याचा दरात आज पुन्हा वाढ, 24, 22 व 18 कॅरेट सोन्याचे भाव जाणून घ्या! title=
Gold Rate Today 6th Jun 2024 check latest price of gold and silver rise in maharashtra

Gold Price Today: सोन्याच्या बुधवारी घट झाल्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्याचे दराने झळाळी घेतली आहे. सराफा बाजारात सोनं पुन्हा एकदा चमकले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढताच भारतीय वायदे बाजारातही सोन्याच्या दराने उसळी घेतली आहे. आज 6 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 770 रुपयांनी वाढला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ नोंदवली आहे. सोन्याच्या दरात गेल्या काही सातत्याने चढ-उतार होत आहे. 

2024 हे वर्ष सुरू झाल्यानंतर सोन्याचे दर काही दिवस स्थिर होते. मात्र,  या वर्षांतच सोन्याचे दर 14 टक्क्यांनी वाढले आहेत. तर, चांदीच्या दरात 27 टक्क्यांची वाढ नोंद केली आहे. या वर्षांत सोन्याच्या दरापेक्षा चांदीने जास्त भाव खाल्ला आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. जानेवारीमध्ये सोनं 2 टक्क्यांनी तर चांदी 4 टक्क्यांनी घसरली होती. तर, फेब्रुवारीमध्ये एक टक्क्यांपर्यंत सोनं मजबूत झाले होते. मात्र, मार्चमध्ये सोन्याचा दर 9 टक्क्यांनी वाढला होता तर चांदीत 6 टक्कांपर्यंत वाढ झाली होती. 

आज 6 जून रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचे दर 6,730 रुपये प्रति ग्रॅम तर, 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम 7,342 इतके आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 67,300 रुपये इतका आहे. तर, 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅमचा भाव 73,420 रुपये इतका आहे. 

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट   67, 300 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट   73, 420 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   55, 060 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6,730 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,342 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5,506  रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   53, 840 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   58,736 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    44, 048  रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  67, 300 रुपये
24 कॅरेट-  73, 420  रुपये
18 कॅरेट- 55, 060 रुपये