मुंबई : भारतीय बाजारांमध्ये सोन्याच्या किंमतींकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असते. सोन्याच्या किंमतींमध्ये होणारी चढ - उतार भारतीयांच्या दैनंदिन जिवनातला कुतूहलाचा विषय असतो. सण - समारंभांमध्ये सोन्याचे असलेले महत्व याला कारणीभूत आहेच परंतु सुरक्षित गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहिले जाते.
सोन्याच्या दरांमध्ये गेल्या आठवड्यात वाढ झाल्याचे दिसून आले. या आठवड्यात हे दर स्थिर होताना दिसत आहेत.
हेदेखील वाचा - Stock to Buy | छप्परफाड कमाईसाठी फुड सेक्टरमधील या शेअरमध्ये गुंतवा पैसा; मार्केट एक्सपर्ट्सची पसंती
सध्या मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये सोन्याचे भाव 47 हजार 970 रुपये प्रतितोळे इतके आहे. तर चांदीचे भाव 61 हजार 547 रुपये प्रतिकिलो इतके आहे.
मुंबईतील सोन्याचे दर
07 डिसेंबर 2021 : 47 हजार 510 प्रति तोळे
06 डिसेंबर 2021 : 47 हजार 510 प्रति तोळे
07 डिसेंबर 2021 : 61 हजार 200 प्रति किलो
06 डिसेंबर 2021 : 61 हजार 500 प्रति किलो
ऑगस्ट 2021 मध्ये सोन्याचे दर 55 हजार प्रतितोळेच्या पुढे गेले होते. येत्या काही महिन्यात सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत.
त्यामुळे सोने काही महिन्यात पुन्हा उसळी घेऊन गेल्या वर्षीचा उच्चांक गाठू शकते असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.