Gold Price Today : 4 ऑगस्टला वाढला सोन्याचा दर, जाणून घ्या आजचा भाव

सोन्याच्या दरात 9000 रुपयांनी घसरण 

Updated: Aug 4, 2021, 12:20 PM IST
Gold Price Today : 4 ऑगस्टला वाढला सोन्याचा दर, जाणून घ्या आजचा भाव

मुंबई : सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहे. बुधवारी म्हणजे 4 ऑगस्ट रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)च्या ऑक्टोबरमध्ये सोन्याच्या दरात 0.14 टक्के वाढ झाली आहे. 0.14 टक्के वाढ झाली असून सोन्याचा दर 47,932 रुपये प्रती 10 ग्रॅम आहे. तर चांदीचा दर 0.32 टक्के वाढ झाली असून चांदीचा दर 68,132 रुपये प्रती किलोग्रॅम आहे. 

देशांतर्गत बाजाराबरोबरच जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या व्यवहारात संमिश्र परिणाम दिसून आला आहे. जागतिक बाजारात मंगळवारी सोने 1814 डॉलर प्रति औंसवर बंद झाले, तर चांदी सप्टेंबर वायदासाठी 25.58 डॉलर प्रति औंसवर बंद झाली.

 

सोन्या-चांदीच्या दरात बदल 

सोमवार आणि मंगळवारी सलग दोन दिवस सोन्यात मंदीचा कल दिसून आला. मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोने 31 रुपयांनी घसरून 46,891 वर बंद झाले. दुसरीकडे, चांदीबद्दल बोलायचे झाल्यास, दिल्ली सराफा बाजारातही 372 रुपयांची घसरण नोंदवली गेली. या घसरणीनंतर, त्याची बंद किंमत 66,072 रुपये प्रति किलो होती. यापूर्वी ट्रेडिंग सत्रात ते 66,444 रुपये प्रति किलो होते.

दरात वाढ होऊ शकते 

कोरोनाच्या काळात ऑगस्ट 2020 मध्ये सोने आपल्या सर्व उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. देशांतर्गत बाजारात, ते त्या पातळीपेक्षा सुमारे 9000 रुपये स्वस्त आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसा,'पुढील 3-5 वर्षात सोन्याचा दर सध्याच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. त्यांच्या मते, केंद्रीय बँका आणि जगभरातील सरकारने तरलतेसह प्रणालीला पूर दिला आहे. त्याचा परिणाम किती धोकादायक असू शकतो, यावर सध्या चर्चा होत नाही'.

ऑगस्ट 2020 मध्ये दराने गाठला होता उच्चांक 

पुढील 3-5 वर्षांत आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 3000-5000 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर असेल. ऑगस्ट 2020 मध्ये, सोने प्रति 2075 च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. हे सध्या 1800 च्या श्रेणीत चालू आहे. सध्या, 10-वर्षीय यूएस बॉण्ड उत्पन्न 1.25 टक्क्यांवर कायम आहे.