Gold and Silver Prices Today in Maharashtra: अक्षय्यतृतीयेपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचे चित्र आहे. सलग दोन दिवस सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर आज मात्र चित्र वेगळे आहे. आज सोन-चांदीच्या दराने उसळी घेतली आहे. गुडरिटर्ननुसार, आज सोनं 430 रुपयांनी महागले आहे. आज सोन्याचा दर 73,250 रुपये इतका आहे. आज चांदीच्या दरातही थोडीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळतेय. आज MCX वर चांदीचा भाव 85,467 रुपये प्रति किलोग्रॅम इतका सुरू आहे. तर, मागील सत्रात म्हणजेच मंगळवारी चांदी 87,600 रुपयांवर बंद झाली होती.
दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोनं-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या देशभरात लग्नसराईचे वातावरण आहे. त्यामुळं सोनं-चांदीच्या मागणीत वाढ होत होती. अक्षय्य तृतीयामुळं सोन्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, तेव्हाही मौल्यवान धातुच्या किंमतीत चढ-उतार होत होते. गेल्या काही दिवसांपासून सोनं 72 हजारांच्या आसपास होते. मात्र , आज बाजारात झालेल्या उलाढालीमुळं सोन्याचा दर 73 हाजारांपार गेला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती आणि इतर चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरमध्ये चढ-उतार यासारख्या जागतिक घटनांचाही भारतीय बाजारातील सोन्याच्या किमतीवर प्रभाव पडतो.
गुडरिटर्ननुसार, आज बुधवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज एका 24 कॅरेटसाठी ग्रॅम सोन्याचा दर 6,715 रुपये आहे तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 7,325 इतका आहे. आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा किंमत 73,250 रुपये आहेत. तर, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा किंमत 67,150 रुपये असून 18 कॅरेट सोन्याच्या दर 54,940 रुपये इतका आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 67,150 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 73, 250 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 54, 940 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 6,715 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7,335 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5,494 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 53,720 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 58,600 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 43,952 रुपये
22 कॅरेट- 67,150 रुपये
24 कॅरेट- 73, 250 रुपये
18 कॅरेट- 54, 940 रुपये