Gold Silver Rate Today | आजही सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या दर

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे.

Updated: Nov 25, 2021, 01:54 PM IST
Gold Silver Rate Today | आजही सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या दर

मुंबई : सोन्याच्या दरांमध्ये मागणी पुरवठ्यानुसार बदल होत असतो. सणासुदीच्या दिवसांमध्ये सोन्याची मागणी वाढलेली असते. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. सोन्याच्या किंमतींमध्ये जागतिक बाजारपेठेनुसारही चढ - उतार होत असते. 

आज सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये व्यवहार सुरू होताच सोन्याच्या किंमतींमध्ये कालपेक्षा घसरण दिसून आली. दुपारी 1 वाजेपर्यंत पुन्हा सोन्याचे भाव सावरताना दिसत आहे. दुपारी एमसीएक्सवर सोन्याचे भाव 47550 रुपये प्रति तोळे इतके होते. तर चांदीच भाव 63003 रुपये प्रति किलो इतके होते.

सोन्याच्या दरांमध्ये काही दिवसांपूर्वी मोठी घसरण झाली होती. त्यानंतर दररोज काही किरकोळ घसरण नोंदवली जात आहे. मुंबईतील सोने - चांदीची गेल्या काही दिवसांचे भाव पाहिल्यास आपल्या लक्षात येते.

मुंबईतील सोन्याचे दर

25 नोव्हेंबर |  47,620  रुपये प्रति तोळे 
24 नोव्हेंबर |  47,630  रुपये प्रति तोळे
23 नोव्हेंबर |  47,990  रुपये प्रति तोळे
22 नोव्हेंबर |  49,280  रुपये प्रति तोळे

मुंबईतील चांदीचे दर 

25 नोव्हेंबर | 62,900 प्रति किलो
24 नोव्हेंबर | 62,700 प्रति किलो
23 नोव्हेंबर | 64,000 प्रति किलो
22 नोव्हेंबर | 65,600 प्रति किलो

सोन्याच्या किमतीत सध्या विक्रमी उच्चांकापेक्षा खूपच स्वस्त आहे.  ऑगस्ट 2020 मध्ये MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती.

त्यामुळे ऑगस्ट 2020 च्या सोन्याच्या दरांच्या तुलनेत आजही सोने 7 ते 8 हजाराने स्वस्त मिळत आहे. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना सोने - चांदीत गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे.