Gold Silver Rate | सोन्याच्या दरात आता तेजीचे संकेत; गुंतवणूकदार नफा वसुलीच्या तयारीत

आज MCX वर सोन्यात प्रति तोळे 300 रुपयांनी वाढ दिसून आली. सोन्याच्या दरांमध्ये पुन्हा तेजी येण्याचे संकेत आहेत

Updated: Jul 29, 2021, 12:45 PM IST
 Gold Silver Rate | सोन्याच्या दरात आता तेजीचे संकेत; गुंतवणूकदार नफा वसुलीच्या तयारीत

मुंबई : आज MCX वर सोन्यात प्रति तोळे 300 रुपयांनी वाढ दिसून आली. सोन्याच्या दरांमध्ये पुन्हा तेजी येण्याचे संकेत आहेत. बुधवारी सोन्यातील ट्रेड फ्लॅट बंद झाला होता. 

या आठवड्यातील सोन्याचे दर (26-30  जुलै)
दिवस                      सोना (MCX ऑगस्ट वायदे)      
सोमवार                 47461/10 ग्रॅम
मंगलवार               47573/10 ग्रॅम
बुधवार                  47577/10 ग्रॅम  
गुरुवार                 47912/10 ग्रॅम 

गेल्या वर्षी सोन्याच्या दरांमध्ये वाढ झाली होती. कोरोना संकटकाळात गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये मोठी गुंतवणूक केली होती. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या दरांनी उच्चांक गाठला होता. 

मुंबईतील आजचे सोन्याचे दर
22 कॅरेट 46,850 प्रतितोळे
24 कॅरेट 47,850 प्रतितोळे

मुंबईतील आजचे चांदीचे दर 
67,200 प्रतिकिलो.

सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. त्यामुळे सोने - चांदीचे रोजचे दर किती याबाबत गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता असते.